You Are All Set to Go!

All you have to do now is upload your website files and start your journey. Check out how to do that below:

VASANT M. KULKARNI https://vasantkulkarni.com Expert Mutual Fund Advisor Sun, 27 Sep 2026 22:19:11 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=7.1.2 https://vasantkulkarni.com/wp-content/uploads/2018/05/cropped-28167696_518484248551916_130858917831635888_n-32x32.jpg VASANT M. KULKARNI https://vasantkulkarni.com 32 32 साद घालते अशी जीवाला …. https://vasantkulkarni.com/flexicap-fund-2/ https://vasantkulkarni.com/flexicap-fund-2/#respond Sun, 27 Sep 2026 22:15:51 +0000 https://vasantkulkarni.com/?p=8585

साद घालते अशी जीवाला ….

अनेक गुंतवणूकदार म्युच्युअल फंडांकडे दीर्घकालीन गुंतवणुकीतून संपत्ती निर्मिती ऐवजी अल्पकालीन नफ्याच्या उद्देशाने केलेली गुंतवणूक म्हणून पाहतात. त्यामुळेच, गुंतवणूकदारांना सल्ला दिला जातो की त्यांनी आपल्या पोर्टफोलिओच्या केंद्रस्थानी वैविध्यपूर्ण फंड ठेवावेत जसे की फ्लेक्झीकॅप आणि मल्टीकॅप फंड. याचे कारण भारतातील सर्वाधिक फंडांचा मानदंड असणारा ‘निफ्टी ५०’ (Nifty 50) देखील अनेकदा काही मोजक्या उद्योग क्षेत्रांकडे झुकलेला दिसून आला आहे. या निर्देशांकात ‘फायनान्शियल’ (वित्तीय) क्षेत्राचा वाटा अनेकदा एक-तृतीयांशपेक्षा जास्त राहिला आहे, तर बाजाराच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर ‘आयटी’ आणि ‘एनर्जी’ क्षेत्रांचे वर्चस्व राहिले आहे. महत्त्वाचा प्रश्न असा आहे की, गुंतवणुकीचे विकेंद्रीकरण झाल्यामुळे दीर्घकालीन परतावा कमी होतो का? दोन दशकांच्या ‘एनएव्ही’ डेटाचा वापर करून केलेल्या १०-वर्षीय आणि १५-वर्षीय ‘रोलिंग रिटर्न्स’च्या विश्लेषणातून असे दिसून येते की, फ्लेक्झीकॅप आणि मल्टीकॅप दीर्घ कालावधीत सर्वात चांगला परतावा देतात आणि कमी अस्थिर असतात. ‘फ्लेक्सी-कॅप’ फंड गट जो वैविध्यपूर्ण ‘ॲक्टिव्ह इक्विटी फंडांचे’ प्रतिनिधित्व करतो, त्या फंड गटाने १०-वर्षीय रोलिंग रिटर्नच्या आधारे किमान ३ टक्के आणि १५-वर्षीय रोलिंग रिटर्नमध्ये किमान ४ टक्के अधिक परतावा दिला. अभ्यासासाठी किमान २० वर्षे पूर्ण केलेले १० फेक्झीकॅप फंड उपलब्ध आहेत. या फंडाचा २० वर्षांचा ‘एनएव्ही’ इतिहास असलेल्या प्रत्येक फ्लेक्झीकॅप फंडाच्या १०-वर्षीय आणि १५-वर्षीय रोलिंग रिटर्न तपासले. या दहा फंडात सर्वात चांगली कामगिरी बंधन फ्लेक्झीकॅप फंडाची आहे. दुसऱ्या क्रमांकावर एचडीएफसी फ्लेक्झीकॅप तर तिसऱ्या क्रमांकावर फ्रॅकलीन फ्लेक्झीकॅप फंड आहे. गमतीचा भाग असा की फ्रॅकलीन फ्लेक्झीकॅप उद्या ३१ वर्षे पूर्ण करेल तर आज बंधन फ्लेक्झीकॅप फंड २१ वर्षे पूर्ण करीत आहे.
भारतीय समभागांच्या मूल्यांकनात सद्य स्थितीत मोठी तफावत दिसून येत आहे. लार्जकॅप अत्यंत स्वस्त तर मिडकॅप आणि स्मॉलकॅप लार्जकॅपच्या तुलनेत महाग दिसत आहेत. उपलब्ध मुल्यांकन संधींनुसार विविध बाजार गटात गुंतवणूक बदलण्याची लवचिकता ‘फ्लेक्सी-कॅप फंडांना’ असते यामुळे गुंतवणूकदारांना गुंतवणुकीत बाजार गटांची विविधता मिळते. जे गुंतवणूकदार किमान पाच वर्षे एसआयपी करू इच्छितात ते बंधन फ्लेक्सीकॅप फंडाचा विचार करू शकतात. सप्टेंबर २००५ मध्ये आयडीएफसी इम्पिरिअल इक्वीटी या नांवाने सुरू झालेला हा फंड आज बंधन फ्लेक्झीकॅप म्हणून ओळखला जातो. या फंडाने कामगिरीचा विश्वासार्ह आलेख आणि एक वेगळा पोर्टफोलिओ तयार केला आहे. ‘आउट ऑफ फॅशन’ला प्रमाण मानून प्रवाहा विरुद्ध गुंतवणूक करणाऱ्या या फंडाने २८ सप्टेंबर २००५ ते २५ सप्टेंबर २०२६ दरम्यान रेग्युलर ग्रोथ एनएव्ही नुसार वार्षिक १५.४४ टक्के दराने परतावा दिला आहे. या फंडाचे विराज कुलकर्णी हे २४ जानेवारी २०२४ पासून निधी व्यवस्थापक आहेत.

पोर्टफोलिओ रचना

निफ्टी टॉप १० इक्वल वेट इंडेक्स हा एक निर्देशांक आहे. हा निर्देशांक हा लेख लिहित असतांना जानेवारीपासून १८ टक्के घसरला आहे. तर ‘निफ्टी ५०० इक्वल वेट इंडेक्स’ या निर्देशांकात ५०० कंपन्या असून प्रत्येक कंपनीचा प्रभाव ०.२ टक्के आहे. हा निर्देशांक जानेवारीपासून ४ टक्के वधारला आहे. म्हणजे दोन निर्देशांकांच्या परताव्याच्या दरात २२ टक्के फरक आहे. या दोन निर्देशांकाची गेल्या पाच वर्षातील कामगिरी तपासली तर ‘निफ्टी टॉप १० इक्वल वेट इंडेक्स’ने वार्षिक ७ टक्के वाढ नोंदली आहे. आणि याच काळात ‘निफ्टी ५०० इक्वल वेट इंडेक्स’ने वार्षिक १४.८७ टक्के वाढ नोंदली आहे. सध्या बाजारा बाबत अशी वदंता आहे की या आघाडीच्या १० कंपन्यांच्या (ॲक्सिस बँक, भारती एअरटेल, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, आयटीसी, इन्फोसिस, कोटक महिंद्रा बँक, लार्सन अँड टुब्रो, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस) नफ्यात पुरेशी वाढ होत नाही आहे. म्हणून या दहा १० कंपन्यांचे मुल्यांकन गेल्या पंधरा वर्षातील निच्चांकी मुल्यांकन आहे. या पैकी काही कंपन्या तर कोविड काळातील निच्चांकाच्या पण खाली गेल्या आहेत. ‘निफ्टी ५०० इक्वल वेट इंडेक्स’चा ‘मेडीयन पीई’ १७ आहे आणि निफ्टी’त या दहा कंपन्यांचा प्रभाव (वेट) ४० टक्के आहे. त्यामुळे या दहा कंपन्यांमुळे निफ्टी पीई बाधित झालेला आहे. वास्तविक निफ्टीचा पीई (या दहा कंपन्या वगळून) उर्वरित ४९० कंपन्यांचा विचार केला असेल तर मेडीयन पीई ३५ पट असून ‘वन इयर फॉरवर्ड पीई २८ पट आहे. आणि निफ्टी टॉप १० इक्वल वेट इंडेक्स’चा ‘ट्रेलिंग पीई’ १८ पट आहे आणि वन यिअर फॉरवर्ड पीई’१६ आहे.

२०१६ ते २०२६ दरम्यानचा विचार केल्यास गेल्या १० वर्षात या मोठ्या १० कंपन्यांनी (निफ्टी टॉप १० इक्वल वेट इंडेक्स) वार्षिक १३ टक्के परतावा दिला आहे. आणि, आहे ‘निफ्टी ५०० इक्वल वेट इंडेक्स’ने १० वर्षात १३ टक्केच परतावा दिला आहे परंतु ही दहा वर्षे २०१६ इत २०२१ आणि २०२१ ते २०२६ अशी विभागली तर, पहिल्या ५ वर्षात हे या दहा कंपन्यांनी विस्तृत बाजारापेक्षा सरस कामगिरी केली आहे. आणि या काळात विस्तृत बाजाराने ६-७ टक्के परतावा दिला होता. बहुतेकांना आठवत असेल, एचडीएफसी, रिलायन्स, आयटीसी, टीसीएस, इंफोसिस, आणि कोटक (ह्रितिक) यांनीच बाजार चालवला होता. मात्र गेल्या पाच वर्षात चित्र उलट आहे. या पाच कंपन्या स्थिर आहेत आणि, उर्वरित बाजराने समाधानकारक परतावा दिला आहे. गेल्या पाच वर्षात यांच योगदान १८ टक्के आहे आणि उर्वरित बदराचे योगदान (४९० कंपन्यांचे) योगदान २४ टक्के आहे. बाजार हा नेहमीच आवर्तीय पद्धतीने वाटचाल करत असतो. जेव्हा तुम्ही आवर्तनाच्या एका टोकाला असता, तेव्हा तुम्हाला गतीच्या विरुद्ध प्रवास करायचा असतो आणि तेव्हाच मोठा परतावा मिळतो. तुम्ही २०२०-२१ मध्ये बहुसंख्य अशा मताचे होते की एचडीएफसी बँक घ्या, कोटक बँक घ्या, टीसीएस घ्या, इन्फोसिस घ्या, कारण या कंपन्यांच्या गुंतवणुकीत नफा आहे. परंतु आज या कंपन्या पुढील पाच वर्षे अशाच राहतील या कंपन्या वगळून खरेदी करा असे सांगणारे आहेत. परंतु या फंडाचे निधी व्यवस्थापक मनीष गुनावाणी आणि विराज कुलकर्णी असे मानत नसावेत, या कंपन्यांचे मुल्यांकन इतके स्वस्त आहे की आगामी तीन ते पाच वर्षात या कंपन्या अविश्वनीय परतावा देतील. म्हणून निधी व्यवस्थापकांनी या कंपन्यांत एकूण पोर्टफोलीओच्या ५० टक्के रक्कम गुंतविली आहे. या फंडाची रणनीती प्रवाहा विरुद्ध गुंतवणूक करण्याची (काउंटर सायक्लिकल एलोकेशन) म्हणजे जेव्हा मिड अँड स्मॉल कॅप खूप महाग असतात तेव्हा २० टक्के अधिक गुंतवणूक मिड आणि स्मॉल कॅपमध्ये करायची आणि मिड अँड स्मॉल कॅप जेव्हा खूप स्वस्त असतात तेव्हा ५० टक्के गुंतवणूक मिड आणि स्मॉल कॅप मध्ये करायची आज या फंडाची मिड आणि स्मॉल कॅपमध्ये २२ टक्के गुंतवणूक आहे. (मध्यंतरी हा फंड आयडीएफसी प्रीमिअर इक्वीटी म्हणून ओळखला जात असे आणि केनेथ अॅड्रु निधी व्यवस्थापक असतांना हे प्रकर्षाने जाणवत असे.) उद्योग क्षेत्राचा विचार केल्यास बँक, माहिती तंत्रज्ञान आणि ग्राहकाभिमुख वस्तू यात निर्देशांकाच्या तुलनेत अतिरिक्त गुंतवणूक आहे. तर भांडवली वस्तू औद्योगिक वापराच्या वस्तू, धातू यात निर्देशांकाच्या तुलनेत अतिरिक्त गुंतवणूक आहे. एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक, भारती एअरटेल, इन्फोसिस, मारुती, आयटीसी आणि टाटा कन्सल्टन्सी या आघाडीच्या दहा गुंतवणुका आहेत. मजबूत व्यवसाय अनेकदा अधिमुल्यावर व्यवहार करतात. तथापि, भविष्यातील परतावा हा कंपन्यांच्या कमाईवर अवलंबून असतो. जेव्हा वाढ निराशाजनक असते, तेव्हा महागडे ग्राहकाभीमुख, ऑटोमोबाईल आणि स्मॉल-कॅप कंपन्या झपाट्याने खाली येऊ शकतात. बंधन फ्लेक्सीकॅप फंडाची रणनीती स्पष्ट असल्याने आणि २० वर्षाचा इतिहास उपलब्ध असल्याने या फंडाची शिफारस केली आहे. हा फंड एक मुख्य सक्रियपणे व्यवस्थापित इक्विटी फंड म्हणून काम करू शकतो. पाच-सात वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीच्या दीर्घकालीन एसआयपीसाठी गुंतवणूकदारांनी या फंडाचा विचार करावा. एकंदरीत, गेल्या एकवीस वर्षात सहा निधी व्यवस्थापकांनी व्यवस्थापित केलेल्या या फंडाची सध्याची कामगिरी फार उत्साहजनक नसली तरी दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी नक्कीच विचार करावी अशी आहे. म्हणूनच अनेकदा हाच फंड गुंतवणुकीसाठी साद घालत असतो.

तुमची प्रतिक्रिया किवा प्रश्न विचारण्यासाठी खालिल फॉर्म भरा:

]]>
https://vasantkulkarni.com/flexicap-fund-2/feed/ 0
हिरेजडीत मुकुट शोभतो बरा … https://vasantkulkarni.com/franklin-india-flexi-cap-fund/ https://vasantkulkarni.com/franklin-india-flexi-cap-fund/#respond Sun, 27 Sep 2026 22:06:47 +0000 https://vasantkulkarni.com/?p=8577

हिरेजडीत मुकुट शोभतो बरा …

जागतिक घटनांमुळे भारतीय शेअर बाजारात गेल्या आठवड्यात मोठी घसरण झाली. भारतीय कंपन्यांना देशांतर्गत ग्राहकांच्या वाढत्या क्रयशक्तीचा आणि वाढत्या दरडोई उत्पन्नाचा फायदा होत आहे, दुसऱ्या बाजूला लार्जकॅप मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्यांमध्ये मूल्यांकनात मोठी तफावत दिसत आहे. गेल्या आठ तिमाहीत आघाडीच्या लार्ज-कॅप निर्देशांक (बीएसइ १००, निफ्टी १००) एका पट्टयात फिरत आहेत. एक बाजूला लार्जकॅप निराशेच्या गर्तेत तर मिड आणि स्मॉल-कॅपचे मुल्यांकन नव्याने गुंतवणूक करण्याच्या पातळीच्या वर आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप महाग असूनही आकर्षक संधीं निधी व्यवस्थापकांना खुणावत आहेत. आणि हे त्यांनी केलेल्या ‘चेरी पिकिंग’मधून दिसत आहे. बाजारातील अनेक क्षेत्रांमध्ये मोठी घसरण झाली असल्याने, गुंतवणूकदारांसाठी काही ठिकाणी ‘व्हॅल्यू बायिंग’ (योग्य मूल्यावर उपलब्ध असलेले समभाग) मिळण्याची संधी दिसत आहे. या पार्श्वभूमीवर लार्ज-कॅप शेअर्सवर अधिक भर देणारा आणि भक्कम कामगिरीचा प्रदीर्घ इतिहास असलेला ‘फ्रँकलिन इंडिया फ्लेक्सी कॅप फंड’ (पूर्वीचा ‘फ्रँकलिन इंडिया इक्विटी फंड’) येत्या २९ सप्टेंबर रोजी ३१ वर्षे पूर्ण करत आहे ‘फ्रँकलिन इंडिया फ्लेक्सी कॅप फंड’ १९५०९ कोटींच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करत असून गेल्या ३१ वर्षात या फंडाने दमदार कामगिरी नोंदवली आहे. या फंडाने २९ सप्टेंबर १९९४ ते १० सप्टेंबर २०२६ दरम्यान वार्षिक १७.१८ टक्के दराने परतावा दिला आहे. याच काळात केलेल्या एसआयपीने १९.७८ टक्के वार्षिक परतावा दिला आहे. अर्थात, दरम्यान या ३१ वर्षांच्या काळात तीन वेळा फंडाची कामगिरी थोडी खालावलेली असली तरी सर्व काळात या फंडाने सातत्यपूर्ण कामगिरी करत आपल्या संदर्भ निर्देशांकाला कामगिरीत मागे टाकले आहे. लार्जकॅप मिडकॅप आणि स्मॉलकॅपचे संतुलन साधणारा हा एक फंड असून पुनरुज्जीवित होत असलेल्या आणि १५ वर्षाच्या निच्चांकी मूल्यांकनाला उपलब्ध असलेल्या लार्ज-कॅप कंपन्यांमुळे दीर्घकालीन दृष्टिकोनातून फ्लेक्सीकॅप फंडात गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ असू शकते.

उत्कृष्ट कामगिरी

या फंडाने पॉइंट-टू-पॉइंट आधारावर मागील ५-वर्ष (११.४७ टक्के), १०-वर्ष (१२.२३ टक्के) १५-वर्षे (१४.३४ टक्के) २०-वर्षे (१३.९६ टक्के) आणि २५-वर्षांच्या कालावधीत, १९.४४ टक्के दराने वार्षिक परतावा दिला आहे. या कामगिरीमुळे या फंडाला या श्रेणीतील काही सर्वोत्तम फंडांमध्ये स्थान मिळाले आहे. गेल्या वीस वर्षात या फंडाची धुरा आर सुकुमार, आर जानकीरामन (२०११ पासून विद्यमान निधी व्यवस्थापक) आनंद राधाकृष्णन, संदीप मदन,आणि के राजसा यांनी संभाळली आहे. या योजनेने मध्यम ते दीर्घ कालावधीत (५ ते ७ वर्षे) निफ्टी ५०० टीआरआय पेक्षा २-४ टक्के फरकांनी अधिक चांगली कामगिरी केली आहे. मागील दहा वर्षात वर्षांतील (१ सप्टेंबर २०१६ ते ३१ ऑगस्ट २०२६) तीन-वर्षांच्या रोलिंग परताव्याचा विचार केल्यास, फ्रँकलिन इंडिया फ्लेक्सी कॅपने २०.४ टक्के सरासरी परतावा दिला आहे. तसेच, उपरोक्त १० -वर्षांच्या कालावधीत, ३वर्षे चलत परतावा (रोलिंग रिटर्न) आधारावर, या फंडाने ९२.७८ टक्के वेळा निफ्टी ५०० टीआरआय सापेक्ष सरस कामगिरी केली आहे. या कालावधीत, या फंडाने जवळपास ७९ टक्के वेळा १५ टक्क्यांपेक्षा जास्त आणि जवळपास ९० टक्के वेळा १२ टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला आहे. गेल्या १० वर्षांतील फंडाचा एसआयपी परतावा (XIRR) १४.४९ टक्के असून फ्लेक्झीकॅप गटात या कालावधीत हा परतावा चौथ्या क्रमांकावर आहे. याच कालावधीत निफ्टी ५०० टीआरआयमधील एसआयपीने ११.१८ टक्के परतावा दिला आहे. या कालावधीत फंडाची रेग्युलर ग्रोथ एनएव्ही ५०६ वरून १५८८ वर गेल्याचे दिसून आले.

पोर्टफ़ोलिओ रचना

फ्रँकलिन इंडिया फ्लेक्सीकॅपने गुंतवणुकीसाठी कंपन्यांच्या निवडीमध्ये लार्ज-कॅप कंपन्यांना प्राधान्य दिले आहे. साधारणपणे फंडाच्या पोर्टफ़ोलिओमध्ये ५६-५७ कंपन्यांचा समावेश असतो. फंडाच्या पोर्टफोलीओ मध्ये लार्ज-कॅपचे प्रमाण एकूण पोर्टफोलिओच्या ७३.३० टक्के आहे. मागील दहा वर्षात अल्प कालावधीत लार्जकॅपचे प्रमाण ७० टक्क्यांपेक्षा कमी झाले होते. मिडकॅपचे प्रमाण १६.०१ टक्के तर स्मॉलकॅपचे प्रमाण ५.३९ टक्के आहे. साधारण ७५ टक्के लार्जकॅप आणि २५ टक्के मिड आणि स्मॉल कॅप अशी पोर्टफोलीओची रचना राहिली आहे. ऑक्टोबर २०२३ मधील भू-राजकीय तणावामुळे आणि त्यावेळी वेगाने वाढणाऱ्या अमेरिकेच्या फेडरल रोख्यांच्या परताव्याच्या दरातील वाढीमुळे निर्माण झालेल्या अस्थिरतेसारखे दुर्मिळ प्रसंग वगळता, फंडाने पोर्टफोलिओच्या ५ टक्क्यांपेक्षा कमी रोख रक्कम ठेवल्याचे दिसून येते. लार्ज-कॅप क्षेत्रात, विशेषतः अलीकडील घसरणीनंतर, मूल्यांकन अभूतपूर्व निच्चांकी पातळीवर असल्याने, पोर्टफोलिओची लार्जकॅप केंद्रित रचना फंडाला पुढील २ ते ३ वर्षात ३२ वर्षातील पाच ३ वर्षाची सर्वोत्तम चलत परतावा देण्याची अपेक्षा गुंतवणूकदार बाळगू शकतात. फंडाची सर्वाधिक गुंतवणूक खाजगी बँका (२१.७९ टक्के) वाहन निर्मिती आणि पूरक उत्पादने (९.५२ टक्के), रोकड (५.०५ टक्के), सेवा (४.९९ टक्के), किरकोळ विक्री दालने (४.८४ टक्के), अभियांत्रिकी आणि भांडवली वस्तू (४.४५ टक्के) या उद्योग क्षेत्रात सर्वाधिक गुंतवणूक आहे. या व्यतिरिक्त फंडाची गुंतवणूक बांधकाम, पायाभूत सुविधा दूरसंचार, सिमेंट आणि सिमेंट उत्पादने यांसारख्या क्षेत्रांमधील गुंतवणूक ही इतर प्रमुख उद्योगक्षेत्रे आहेत आणि बाजार व उद्योगाच्या परिस्थितीनुसार त्यात बदल केला जातो. हा फंड प्रामुख्याने ‘व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग’ला प्राधान्य देतो. पोर्टफोलिओमध्ये मिड आणि स्मॉलकॅप मधील काही ‘ग्रोथ पिक्स’चाही समावेश आहे. मिड आणि स्मॉल-कॅपमध्ये निवडक उद्योग क्षेत्रांमध्ये ही संधी उपलब्ध असल्याचा फायदा निधी व्यवस्थापक उचलत आहेत. नव्याने गुंतवणुकीत समावेश केलेली शैली इंजिनिअरिंग प्लास्टिक्स आणि एसबीएफसी फायनांस ही वानगीदखल उदाहरणे म्हणून पाहता येतील. जिथे लार्ज-कॅप स्टॉक्सची उपलब्धता मर्यादित आहे, जसे की वाहन पूरक उत्पादे, औद्योगिक उत्पादने, भांडवली वस्तू इत्यादी. हा फंड काही प्रमुख कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक करतो. एकूण पोर्टफोलिओमध्ये आघाडीच्या ५ गुंतवणुकीचे प्रमाण २५ टक्के तर आघाडीच्या १० गुंतवणूकांचे प्रमाण ४१ टक्के आहे.

हा लेख लिही पर्यंत ऑगस्ट महिन्याची म्युच्युअल फंडाची मासिक आकडेवारी उपलब्ध नव्हती परंतु हा लेख प्रसिद्ध होईल तोपर्यंत म्युच्युअल फंडांची ऑगस्ट आकडेवारी उपलब्ध झालेली असेल. जुलैमध्ये मासिक गुंतवणूक कमी होऊन सुद्धा इक्विटी म्युच्युअल फंड गुंतवणुकीमध्ये या फ्लेक्झीकॅप गटाचा मोठा वाटा होता. जुलै महिन्यांत फ्लेक्सी-कॅप फंडांमध्ये ४,७०९ कोटी रुपये गुंतविण्यात आले. जूनमध्ये हा आकडा ५,२३१ कोटी रुपये होता. या फंड गटात म्युच्युअल फंड खाती (फोलिओ) आणि मालमत्ता या दोन्हीमध्ये दमदार वाढ दिसून आली आहे. फ्लेक्सी-कॅप फंडांनी वार्षिक २५.७ टक्के सर्वाधिक फोलिओ वाढ नोंदवली आहे. या दमदार गुंतवणुकीमुळे गेल्या महिन्यात एकूण निव्वळ इक्विटी गुंतवणुकीत १९ टक्के आणि गेल्या १२ महिन्यांत २७ टक्के बाजारहिस्सा मिळाला आहे, , ही वाढती गुंतवणूक केवळ परताव्याच्या अपेक्षेने केलेली नसून गुंतवणूकदार आता ठराविक मार्केट-कॅपऐवजी निधी व्यवस्थापकांच्या नेतृत्वाखालील गुंतवणुकीकडे असल्याचा हा पुरावा असल्याचे मानले जाते. या फंडात ७-१० वर्षे एसआयपी (SIP) मार्गाने किंवा ४ ते ५ वर्षांसाठी एक रक्कमी गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना निराश करू नकोस अशी प्रार्थना आज आगमन होत असलेल्या श्रीगणेशाकडे करूया

तुमची प्रतिक्रिया किवा प्रश्न विचारण्यासाठी खालिल फॉर्म भरा:

]]>
https://vasantkulkarni.com/franklin-india-flexi-cap-fund/feed/ 0
कधी सोशीला उन्हाळा कधी लाभला विसावा.. https://vasantkulkarni.com/icici-prudential-nifty-private-bank-index-fund/ https://vasantkulkarni.com/icici-prudential-nifty-private-bank-index-fund/#respond Sun, 30 Aug 2026 06:20:26 +0000 https://vasantkulkarni.com/?p=8555

कधी सोशीला उन्हाळा कधी लाभला विसावा..

एचडीएफसी बँक ही अग्रणी खाजगी बँक असून जानेवारी २०२६ पासून बँकेचा समभाग २८ टक्के घसरला आहे. मागील आठवड्यात बँकेच्या समाभागाने ५२ आठवड्यातील निच्चांकाची नोंद केली. तर जानेवारीपासून अग्रणी राष्ट्रीयकृत स्टेट बँक ऑफ इंडिया १.२८ टक्क्यांनी वधारला आहे.एचडीएफसी बँकेच्या या घसरणीला मुख्यत्वे घटलेली नफा क्षमता (नेट इंटरेस्ट मर्जीन) सुमारे ३.२६% पर्यंत घसरले आहे, जे अपेक्षेपेक्षा कमी आणि एचडीएफसी बरोबरच्या विलीनीकरणापूर्वीच्या ऐतिहासिक पातळीपेक्षाही खूप कमी आहे. एचडीएफसी लिमिटेडसोबत २०२३ मध्ये झालेल्या विलीनीकरणामुळे बँकेवर महागडी जुनी कर्जे संक्रमित झाली. त्यांच्या सेवा शुल्काचा (दलाली) खर्च सामान्य किरकोळ ठेवींपेक्षा जास्त आहे. ठेवीदारांनी जास्त व्याज देणाऱ्या मुदत ठेवींमध्ये पैसे वळवल्यामुळे, स्वस्त आणि कमी खर्चाच्या चालू व बचत खात्यातील ठेवींचा वाटा (‘कासा’) अंदाजे ३२% पर्यंत कमी झाला, ज्यामुळे बँकेचा व्याजाचा खर्च वाढला. बँकेने मागील वर्षाच्या तुलनेत चांगला नफा आणि निव्वळ व्याज उत्पन्नात वाढ नोंदवली असली तरी, हे आकडे प्रमुख विश्लेषकांच्या अंदाजापेक्षा खूप कमी होते, ज्यामुळे समभाग गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीत नफावसुली (प्रॉफिट बुकिंग) केली. एचडीएफसी बँकेत परकीय गुंतवणूकदारांचा मोठा वाटा होता. जागतिक कच्च्या तेलाच्या किमती आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भारतातल्या गुंतवणुकी बाबत आणि विशेषत: बँकिंग क्षेत्राबाबत बाळगलेली सावधगिरी यामुळे एकूणच मोठी विक्री झाली. गेली दोन वर्षे कर्जपुरवठ्यात मंद वाढ होती. आता बँकांच्या आणि विशेषत: खाजगी बँकांच्या कर्ज वितरणात म्हणावी तशी वाढ होत नसल्याचा हा परिणाम होता. आता खाजगी बँकांच्या कर्ज वितरणात वाढ होण्याची सुरुवातीची चिन्हे दिसु लागली आहेत. गणपती ते दिवाळी हा भारतात बँकांना कर्जवाटपासाठी सुगीचा हंगाम समाजाला जातो. कच्च्या मालाचे पुरवठादार, विविध ग्राहकाभिमुख वस्तूंचे उत्पादक सणासुदीच्या हंगामासाठी सिद्ध होत आहेत. याचे चित्र कर्ज वितरणातील वाढीत उमटले आहे. सण उत्सवांमधील संभाव्य मागणी, सरकारी उपाययोजना, सुधारलेली रोकड सुलभता आणि बँकांच्या मालमत्तेची स्थिर गुणवत्ता यामुळे कर्ज मागणीत वाढ झाली आहे. ऑगस्ट महिन्यातील ताज्या पत धोरणात रिझर्व्ह बँकेने स्थिर राखलेले व्याजदर आणि महागाईबाबतचे अंदाज या उद्योग क्षेत्राला आधार देत आहेत; मात्र, ठेवींवरील व्याजदर स्थिर राखण्यास मर्यादित वाव असल्याने, पुढील काही दिवसांत बँकांना वाढत्या कर्ज मागणीस सामोरे जाण्यासाठी ठेवी संकलन वाढवावे लागेल. ठेवी संकलनात अडथळे असल्याने बँकांना ठेवी दरात लवकरच वाढ करावी लागेल. ठेवी दर वाढविल्याने बँकांच्या नफ्याचे प्रमाण थोडे कमी होऊ शकते. गेल्या ३ वर्षांत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे; ‘निफ्टी पीएसयू बँक इंडेक्स’च्या वाढीत याचे चित्र उमटले आहे. ८ ऑगस्ट २०२५ रोजी ६९०९ वर असलेला ‘निफ्टी पीएसयू बँक इंडेक्स’ २१ ऑगस्ट २०२६ रोजी ८६२०वर पोहचला आहे. याच काळात ८ ऑगस्ट २०२५ रोजी निफ्टी प्रायव्हेट बँक इंडेक्स २६५६४ वरुन २१ ऑगस्ट २०२६ रोजी २७५९१ वर पोहचला आहे. गेल्या दोन वर्षात खाजगी बँकांचे मूल्यांकन त्यांच्या दीर्घकालीन सरासरीपेक्षा कमी झाले आहे. ज्यामुळे गुंतवणुकीसाठी ही एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. खाजगी बँकांच्या कर्ज वितरणाला गती मिळत असल्याने वर्तमान मूल्यांकन दीर्घकालीन सरासरीपेक्षा कमी असल्याने, खाजगी बँकांमध्ये २ ते ५ वर्षासाठी केलेल्या गुंतवणूकीतून चांगला फायदा कमाविण्याची संधी उपलब्ध झाली आहे. खाजगी बँकांत गुंतवणूक करणाऱ्या आयसीआयसीआय पृडेंशिअल निफ्टी प्रायव्हेट बँक इंडेक्स फंडाचा या साठी विचार केला जाऊ शकतो.
गेल्या दोन वर्षांत कर्जपुरवठ्याची वाढ समाधानकारक नव्हती जुलै महिन्याच्या बँकिंग सांख्यीकीत भारतातील कर्ज वितरणातील वाढ पुनरुज्जीवीत होण्याची सुरुवातीची चिन्हे दिसू लागली आहेत. रिझर्व्ह बँकेचे वैयक्तिक कर्जदारांच्या विनातारण कर्जा (क्रेडीट कार्ड कर्जे) बाबतचे कडक धोरण आणि वैयक्तिक कर्जदारांकडून मागणीतील घट यामुळे पूर्ण आर्थिक वर्ष २०२५ आणि २०२६ च्या पहिल्या तिमाहीत कर्ज वाढीचा वेग मंदावला होता, परंतु आता दुसऱ्या तिमाहीत कर्ज वितरणात पुन्हा वाढ होताना दिसत आहे. जुलै २०२६ पासून कर्ज वितरणात १०% हून अधिक वार्षिक वाढ झाली आहे. १५ जुलै २०२६ रोजी संपलेल्या पंधरवड्यात, कर्ज वाढीचा वार्षिक दर ११.७६% इतका होता. हा दर बँकिंग प्रणालीत चांगला समजला जातो. या वाढीला विविध घटकांचा आधार मिळाला आहे. अधिक महिन्यामुळे लांबलेला सणासुदीचा हंगाम, तसेच मागील वर्षी जाहीर केलेल्या विशिष्ट कर सवलती, वस्तू आणि सेवाकर रचनेतील बदल कमी व्याजदर आणि बँकिंग प्रणालीत उपलब्ध असलेली रोकड सुलभता यांसारख्या मौद्रिक आणि वित्तीय उपाययोजनांचा परिणाम कर्ज वितरणातील वाढ आणि कर्ज मागणीतील सुधारणेमध्ये दिसून येत आहे.
ही सकारात्मक वळणाची स्थिती अशा वेळी आली आहे जेव्हा संपूर्ण बँकिंग क्षेत्रातील ताळेबंद मागील दहा वर्षातील सर्वात सुस्थितीत आहेत आणि मालमत्तेच्या गुणवत्तेचे कल स्थिर आहेत. ज्या सूक्ष्म वित्त आणि विनातारण कर्ज विभागांवर परिणाम झाला होता, तिथेही आता स्थिरता आणि सुधारणेची चिन्हे दिसत आहेत. बँकांनी त्यांच्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाही निकाला नंतर व्यवस्थापनाच्या अलीकडील विधानांवरून (मॅनेजमेंट डिस्कशन) असेही सूचित होते की, अनुत्पादित कर्ज आणि ‘स्पेशल मेन्शन अकाउंट’च्या (ही एक कर्ज वर्गीकरण पद्धत आहे, जी बँकांद्वारे कर्ज परतफेडीत भविष्यात अनियमितता होण्याची सुरुवातीची चिन्हे दर्शविण्यासाठी वापरली जाते, जेणेकरून ती खाती अनुत्पादक मालमत्ता (एनपीए) बनण्यापूर्वीच ओळखता येतील. भारतीय रिझर्व्ह बँकेने सुरू केलेली ही पद्धत, एक पूर्व-सूचना प्रणाली म्हणून काम करते.) स्थितीत टप्प्याटप्प्याने सुधारणा होत आहे. मौद्रिक शिथिलता कर्ज वितरणातील वाढीव्यतिरिक्त, बँकिंग क्षेत्रासाठी आणखी एक सकारात्मक बाब म्हणजे रिझर्व्ह बँकेने स्थिर व्याजदर राखणे. व्याज दर पुढील ६-९ महिन्यांसाठीही स्थिर राहण्याची शक्यता आहे.
रोख्यांवरील परताव्याच्या दरात (yields) झालेली वाढ बँकांच्या रोखे पोर्टफोलिओवर ‘मार्क-टू-मार्केट’ (बाजारभावानुसार मूल्यमापन) नकारात्मक परिणाम घडवून आणू शकते. परिणामी आर्थिक वर्ष २०२७ साठी बँकांच्या नफ्याच्या आधीच्या अंदाजांमध्ये थोडी कपात होऊ शकते. गेल्या काही वर्षांत, नफ्यातील वाढ आणि मालमत्तेच्या गुणवत्तेत झालेली सुधारणा यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या मूल्यांकनात सुधारणा (रिरेटिंग) दिसून आली आहे. ज्या सार्वजनिक केह्त्रातील बँकांचे व्यवहार पूर्वी ‘१x फॉरवर्ड पीबी’ (प्राईस टू बुक) गुणोत्तरापेक्षा कमी दराने होत होते, त्या आता त्यांच्या दीर्घकालीन सरासरीपेक्षा अधिक दराने व्यवहार करत आहेत. या मूल्यांकनातील बदलामुळे बँकिंग निर्देशांकाच्या कामगिरीत तफावत दिसून आली आहे. ऑक्टोबर २०२२ ते जुलै २०२६ या काळात, ‘निफ्टी पीएसयु बँक इंडेक्स’मध्ये मोठी वाढ झाली असून, या निर्देशांकाने ‘निफ्टी ५०’ आणि ‘निफ्टी प्रायव्हेट बँक इंडेक्स’ या दोन्हीपेक्षा सरस कामगिरी केली आहे. मात्र ‘निफ्टी प्रायव्हेट बँक इंडेक्स’ची कामगिरी ‘निफ्टी ५०’ निर्देशांकाच्या तुलनेत जवळ जवळ १६ टक्क्यांनी कमी राहिली आहे. गेल्या तीन वर्षांत तुलनेने कमी कामगिरी झाल्यामुळे, खाजगी बँकांचे व्यवहार आता त्यांच्या १० वर्षांच्या सरासरी ‘फॉरवर्ड पी/बी गुणोत्तराच्या तुलनेत २० टक्के सवलतीच्या दराने होत आहेत. परिणामी, खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या मूल्यांकनातील तफावत आता कमी होण्यास सुरवात झाली आहे.
‘निफ्टी प्रायव्हेट बँक इंडेक्स मध्ये एक्सिस बँक, बंधन बँक, फेडरल बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक, इंडसइंड बँक. कोटक महिंद्रा बँक, आरबीएल बँक आणि यस बँक या बँकांचा समावेश होतो. (एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक या दोन बँकांचा निर्देशांकात ६४ टक्के प्रभाव आहे. ऑक्टोबर महिन्यांत निर्देशांकाची पुन:र्रचना होणे अपेक्षित आहे). खाजगी बँकांचे वाजवी मूल्यांकन, कर्ज वाटपाच्या वाढीतील सुधारणा आणि मालमत्तेची स्थिर गुणवत्ता यामुळे खाजगी बँकांमध्ये गुंतवणूक करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. हे लक्षात घेऊन, गुंतवणूकदारांनी आयसीआयसीआय पृडेंशिअल निफ्टी प्रायव्हेट बँक इंडेक्स फंडाचा विचार करावा फंडाचा पोर्टफोलीओ मल्टी-कॅप घाटणीचा परंतु लार्जकॅप कडे झुकलेला फंड आहे. खाजगी बँका व्यवसायात आघाडीवर आहेत आणि/किंवा उत्तम अंमलबजावणी व्याप्ती, तंत्रज्ञानाचा चांगला अवलंब इत्यादींमुळे बाजार हिस्सा वाढवत आहेत. स्थिर आणि शाश्वत वाढ होण्याची शक्यता आहे, आणि नफ्यात सुधारणा होण्याची शक्यता आहे आणि खाजगी बँकांचे पुनर्मूल्यांकन होण्याची शक्यता असल्याने या फंडाची शिफारस करीत आहे.दोन ते तीन वर्षात या गुंतवणुकीवरील परतावा रुपी ‘स्वप्नातल्या कळ्या’ उमलतील अशी अशा वाटते.

तुमची प्रतिक्रिया किवा प्रश्न विचारण्यासाठी खालिल फॉर्म भरा:

]]>
https://vasantkulkarni.com/icici-prudential-nifty-private-bank-index-fund/feed/ 0
अॅक्सीस मल्टीकॅप फंड https://vasantkulkarni.com/axis-multicap-fund/ https://vasantkulkarni.com/axis-multicap-fund/#respond Sat, 29 Aug 2026 20:51:04 +0000 https://vasantkulkarni.com/?p=8549

अॅक्सीस मल्टीकॅप फंड

सेबीने फेब्रुवारी २०२१ मध्ये ‘मल्टी-कॅप फंड’ हा नवीन फंड प्रकार सुरू करण्यास फंड घराण्यांना परवानगी दिली. या फंड प्रकारात किमान प्रत्येकी २५ टक्के गुंतवणूक लार्ज-कॅप, मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप कंपन्यांत करणे अनिवार्य करण्यात आले. सध्या या फंड गटात एक वर्ष पूर्ण केलेले ३१ फंड आहेत. त्यापैकी, अनेक फाब्द जसे की ‘इनव्हेस्को म्युच्युअल फंड’ आणि ‘निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंड’ हे हा फंड गट अस्तित्वात येण्यापासून अस्तित्वात आहेत. आधी दुसऱ्या फंड प्रकारात असणारे हे फंड हा फंड प्रकार अस्तित्वात आल्या नंतर फंड घराण्यांनी या फंडांना या फंड गटात संक्रमित केले. या दोन फंडांनी सात वर्षांहून अधिक काळापासून आपल्या पोर्टफोलिओची रचना सध्याच्या मल्टी-कॅप नियमावलीशी सुसंगत ठेवली आहे. उर्वरित फंड हा फंड गट अस्तित्वात आल्यानंतर म्हणजे फेब्रुवारी २०२१ नंतर अस्तित्वात आलेले फंड आहेत. जे फंड फेब्रुवारी २०११ नंतर अस्तित्वात आले त्या पैकी डिसेंबर २०२२ मध्ये अस्तित्वात आलेल्या अॅक्सीस मल्टीकॅप फंडाने एसआयपी गुंतवणुकीवर (२३ डिसेंबर २०११ ते २४ जुलै २०२६ ) वार्षिक १५.५६ टक्के दराने तर २३ डिसेंबर २०११ रोजी केलेल्या एक रक्कमी गुंतवणुकीवर वार्षिक १४.३६ टक्के दराने परतावा दिलेला आहे. या फंडाने नुकताच १० हजार कोटी मालमत्तेचा टप्पा पार केला असून आहे. हा फंड एक रक्कमी गुंतवणूक क्रमवारीत ३ वर्षे आणि ४ वर्षे कामगिरीत अनुक्रमे दुसऱ्या आणि चवथ्या स्थानी आहे.
२३ डिसेंबर २०२१ रोजी पहिली एनएव्ही जाहीर केलेल्या या फंडाला सुरवात होऊन दीर्घ कालावधी लोटला नसला तरी सुरुवातीपासून आतापर्यंत या फंडाने वार्षिक १५ टक्क्याहून अधिक परतावा (CAGR) दिला आहे. व्यवस्थापनातील सातत्याचाही या फंडाला फायदा झाला आहे; श्रेयस देवलकर हे या फंडाचे गेले तीन वर्षे निधी व्यवस्थापक आहेत. त्यांच्या जोडीला नितीन अरोरा आणि हितेश दास हे नियुक्त निधी व्यवस्थापक आहेत. निधी व्यवस्थापक साधारण तीन ते पाच वर्षांच्या कालावधीचा विचार करून गुंतवणुकीचे मूल्यमापन करतात. अनेक कंपन्या वाजवी मुल्यांकनामुळे आणि दर्जेदार व्यवसायांमुळे फंडाच्या सुरवातीपासून गुंतवणूकीत कायम आहेत. या दृष्टिकोनामुळे फंडाचे ‘पोर्टफोलिओ टर्नओव्हर रेशो’ (पोर्टफोलिओमधील खरेदी-विक्रीचे प्रमाण) सुमारे २९ टक्के राहिले आहे, जे या श्रेणीतील सर्वात कमी प्रमाणांपैकी एक आहे (या श्रेणीतील सरासरी प्रमाण सुमारे ८० टक्के आहे). स्टेट बँक आणि एचडीएफसी बँक यांसारखे कंपन्या जवळपास चार वर्षांपासून फंडाच्या पोर्टफोलिओचा भाग राहिले आहेत. फंडाच्या गुंतवणुकीत १०५ कंपन्या असून आघाडीच्या १० गुंतवणुकीचे प्रमाण २५ टक्क्यांहून कमी आहे. कंपन्यांची निवड तीन मुख्य निकषांवर आधारित असते: व्यवसायाचा दर्जा, व्यवस्थापनाचा दर्जा आणि मूल्यांकन. निधी व्यवस्थापक अशा कंपन्यांची निवड करतो ज्यांच्याकडे स्पर्धात्मक आघाडी (competitive advantage) टिकवून ठेवण्याची क्षमता आहे, सक्षम व्यवस्थापन आहे आणि उच्च दर्जाचे अनुपालन आहे. त्याच वेळी, हा फंड मूल्यांकनाबाबतही अतिशय जागरूक असतो. अशा व्यवसायांमधील गुंतवणूक टाळतो जिथे भविष्यातील वाढीच्या अपेक्षांची किंमत सध्याच्या मूल्यांकनात समाविष्ट झालेली असते. या फंडाच्या मूल्यांकन आराखड्यामध्ये ‘रिटर्न ऑन इक्विटी’ (RoE) हा एक महत्त्वाचा निकष मानला जातो. मध्यम कालावधीत १५-२० टक्के RoE राखण्यास किंवा गाठण्यास सक्षम असलेल्या कंपन्यांना प्राधान्य दिले जाते; कारण यामुळे कंपन्यांना अंतर्गत स्रोतांतून वाढीसाठी निधी उभारता येतो आणि भागधारकांच्या हिश्श्याचे प्रमाण कमी होणे टाळता येते. हा फंड एक वेगळा दृष्टिकोन स्वीकारतो, आणि अशी उद्योग क्षेत्रे व कंपन्या ओळखतो जिथे मूलभूत बाबीमुळे झालेल्या घसरणीमुळे नव्हे, तर तात्पुरत्या बाह्य घटकांमुळे मूल्यांकन कमी झाले आहे. हा फंड अशा कमी खरेदी केलेल्या कंपन्यांचा शोध घेतो, जिथे कमाईची शक्यता सुधारत असूनही गुंतवणूकदारांचा कल कमी झाला आहे. उदयोन्मुख व्यवसायांमध्ये, लक्ष केवळ आर्थिक मापदंडांपुरते मर्यादित राहत नाही. पोर्टफोलिओच्या रचनेत लार्ज-कॅप, मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप कंपन्यांचा समावेश असतो, ज्यात बॉटम-अप स्टॉक निवड आणि चक्रवाढ वाढीवर विशेष भर दिला जातो. गेल्या काही वर्षांमध्ये, फंडाची सध्याची स्थिती लार्ज-कॅप्समध्ये ४१.३४ टक्के, मिड-कॅप्समध्ये २५.०६ टक्के आणि स्मॉल-कॅप्समध्ये २८.९७ टक्के आहे. बहुतेक इक्विटी फंड प्रकारांच्या विपरीत, मल्टी-कॅप फंड, मालमत्तेच्या आकाराची पर्वा न करता, विशेषतः स्मॉल-कॅप प्रकारच्या कंपन्यात मोठ्या प्रमाणात मालमत्ता वाटप केलेले दिसते. या फंडात स्मॉलकॅप आवश्यक तितक्या (किमान २५ टक्के) पातळीपेक्षा थोडी अधिक ठेवले आहे. स्मॉल कंपन्यांच्या वाढीमध्ये सहभागी होण्याची संधी प्राप्त करून देते. फंडाच्या गुंतवणुकीत १०५ कंपनी असून त्या पैकी ६७ कंपन्या स्मॉलकॅप प्रकारात मोडणाऱ्या आहेत. मालमत्ता प्रमाणात २८ टक्के परंतु संख्येने ५० टक्क्यांहून अधिक असल्याने उत्तम जोखीम व्यवस्थापन साधले आहे. फंड मॅनेजरच्या मते, स्मॉल-कॅप गुंतवणुकीकडे दीर्घकालीन दृष्टिकोनातून पाहिले जाते, आणि कंपन्यांना त्यांचे स्मॉलकॅप माधीन मिडकॅप मध्ये संक्रमण पूर्णपणे वापरता यावे यासाठी अनेक कंपन्या गुंतवणुकीत दीर्घकाल राखून ठेवल्या जातात. महत्त्वाचे म्हणजे, स्मॉल-कॅप परीघ विस्तारित झाल्याचा फायदा या फंडाने पूर्णपणे घेतला आहे. आज स्मॉल-कॅप म्हणून वर्गीकृत केलेल्या अनेक कंपन्यांचे बाजार भांडवल ₹३५,००० कोटींपेक्षा जास्त आहे, ज्यामुळे त्या पूर्वीच्या पारंपरिक स्मॉल-कॅप कंपन्यांपेक्षा लक्षणीयरीत्या मोठ्या आणि अधिक रोकड सुलभ बनल्या आहेत. हाच दृष्टिकोन प्रतिबिंबित करत, फंडाच्या स्मॉल-कॅप वाटपापैकी ८०-९० टक्के गुंतवणूक ₹३५,००० कोटींपेक्षा जास्त बाजार भांडवल असलेल्या कंपन्यांमध्ये केली जाते. एकूण पोर्टफोलिओमध्ये ₹१५,००० कोटींपेक्षा कमी बाजारमूल्य असलेल्या कंपन्यांमधील गुंतवणूक ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे, ज्यामुळे रोकड सुलाभतेचा धोका मर्यादित राहतो.सध्या, या फंडाने वित्तीय सेवा, वाहन निर्मिती आणि वाहन पूरक उत्पादने भांडवली वस्तू आरोग्य निगा, ग्राहक विवेकाधीन व्यवसाय क्षेत्रात अधिक गुंतवणूक केली आहे.
फंडाने साडेचार वर्षे पूर्ण केली आहेत. त्यामुळे पाच ऐवजी तीन वर्षांच्या ‘रोलिंग’ कालावधीचा विचार करता, या फंडाने सरासरी २१.४ टक्के वार्षिक परतावा दिला आहे; याच काळात ‘निफ्टी ५०० मल्टीकॅप ५०:२५:२५ टीआरआय’ (Nifty500 Multicap 50:25:25 TRI) चा परतावा १८.५८ टक्के होता. या कालावधीत वार्षिक परतावा १८ टक्के ते ३६ टक्के या दरम्यान राहिला. तीन वर्षांच्या ‘रोलिंग’ आधारावर, फंडाने ६९.१७ टक्के वेळा सरासरी वार्षिक परतावा दिला, जो या श्रेणीतील २० टक्के पेक्षा अधिक आहे. या सरासरी परताव्यापेक्षा अधिक आहे. फंडाची रोलिंग रिटर्न आकडेवारी सोबतच्या कोष्टकात दिली आहे.
तरीही, स्मॉल-कॅपमधील अनिवार्य गुंतवणुकीमुळे, बाजारातील घसरणीच्या काळात ‘फ्लेक्सी-कॅप फंडां’च्या तुलनेत यात अधिक अस्थिरता (volatility) दिसून येते. त्यामुळे, गुंतवणूकदारांनी किमान पाच ते सात वर्षांचा कालावधी लक्षात घेऊन गुंतवणूक करावी आणि बाजारातील चढ-उतारांचा सामना करण्यासाठी शक्यतो ‘सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’ (SIP) द्वारे गुंतवणूक करावी.

तुमची प्रतिक्रिया किवा प्रश्न विचारण्यासाठी खालिल फॉर्म भरा:

]]>
https://vasantkulkarni.com/axis-multicap-fund/feed/ 0
वेधले हो मन तयाचिये गुणीं https://vasantkulkarni.com/large-and-mid-cap-fund/ https://vasantkulkarni.com/large-and-mid-cap-fund/#respond Mon, 10 Aug 2026 04:39:12 +0000 https://vasantkulkarni.com/?p=8541

वेधले हो मन तयाचिये गुणीं

एक वर्षापूर्वी म्हणजे ८ ऑगस्ट २०२५ रोजी ‘बीएससी १००’ २५५०४ होता तर बीएससी मिडकॅप १५०’ १५४७१ होता. गेल्या वर्षभरात लार्जकॅपचे जे सेक्टर्स आहेत, म्हणजे प्रायव्हेट बँक, आयटी, ऑटो आणि विशेषत: आयटी या सगळ्या सेक्टरचे ‘डीरेटिंग’ झाले आहे. प्रत्येक सेक्टर साठी वेगवेगळी करणे आहेत. या सेक्टर्समध्ये वाढ दिसत नाही. बँकांसाठी महत्वाचे असणारे कर्ज वितरणात वाढ नाही ठेवी गोळा करण्यास जास्त व्याजदर द्यावे लागणे, अशा वेगवेगळ्या कारणांमुळे सगळ्यांचं डी-रेटिंग झाल आहे. आणि मिडकॅपमध्ये बऱ्यापैकी ग्रोथ दिसत आहे त्यामुळे री-रेटिंग झालंय झाल आहे, परंतु मुल्यांकन महाग आहे. जिथे ग्रोथ आहे तिथे मुल्यांकन महाग आहे आणि जिथे मुल्यांकन वास्तविक आहे तिथे ग्रोथ नाही. साहजिकच लार्ज अँण्ड मिडकॅप फंड हा फंड प्रकार आहे, त्या फंड प्रकारात वाजवी मुल्यांकन आणि वृद्धी यांचा समतोल सापडतो. भारतातील ‘ॲक्टिव्हली मॅनेज्ड’ (सक्रीय व्यवस्थापित) समभाग फंडांना, विशेषतः लार्ज अॅण्ड मिडकॅप श्रेणींमध्ये, संदर्भ निर्देशांकापेक्षा सातत्याने चांगली कामगिरी करणे कठीण जात आहे. तरीही, जगातील बहुतेक प्रमुख बाजारपेठांचा विचार केला तर जगातील सक्रीय व्यवस्थापित फंडांच्या तुलनेत भारतातील लार्ज अँण्ड मिडकॅप फंडांची कामगिरी तुलनेने समाधानकारक राहिली आहे. जगातील म्युच्युअल फंडाचा मागोवा घेणाऱ्या मॉर्निंग स्टारच्या आकडेवारीनुसार , जुलै २०२६ रोजी संपलेल्या पाच वर्षांच्या कालावधीत ७१ टक्के लार्ज-कॅप फंड आणि ७६ टक्के मिड-कॅप फंडांनी त्यांच्या बेंचमार्कसापेक्षा खराब कामगिरी केली आहे. फ्लेक्सी-कॅप फंडांसाठी हे प्रमाण ५९ टक्के इतके कमी होते. स्मॉल-कॅप फंडांपैकी सर्वात कमी फंडांची कामगिरी बेंचमार्क सापेक्ष खराब राहिली. स्मॉलकॅप फंड गटात भारतातील ४३ टक्के फंड त्यांच्या बेंचमार्कपेक्षा कमी परतावा देणारे होते. ही आकडेवारी सक्रीय व्यवस्थापित फंडाची संमिश्र कामगिरी दर्शवते. बहुतेक सक्रीय व्यवस्थापित फंड अजूनही त्यांच्या संदर्भ निर्देशांकांच्या तुलनेत मागे आहेत, परंतु विविध फंड गट आणि बाजारातील टप्प्यांनुसार याचे परिणाम वेगळे आहेत. एसअँण्डपी ग्लोबलच्या ‘एसपीआयव्हीए’ अहवालानुसार, एक, तीन, पाच आणि दहा वर्षांच्या कालावधीत जागतिक सरासरीच्या (मेडीयन) तुलनेत भारतीय फंडांची कामगिरी इतर उभरत्या अर्थव्यवस्थांच्या तुलनेत अधिक चांगली राहिली आहे. ‘एसीइ एमएफ नेक्स्ट’ हे ‘एकोर्ड फिनटेक’ने विकसित केलेले एक सर्वसमावेशक म्युच्युअल फंड संशोधन आणि डेटाबेस प्लॅटफॉर्म आहे. हा प्लॅटफॉर्म भारतीय म्युच्युअल फंडांसाठी विश्लेषणात्मक आकडेवारी, कामगिरीचा मागोवा आणि पोर्टफोलिओ डेटा उपलब्ध करून देते; यामध्ये ४० हून अधिक ॲसेट मॅनेजमेंट कंपन्या आणि हजारो सक्रिय योजनांचा समावेश आहे. ताज्या अहवालात २०२० ते २०२५ या कालावधीत प्रत्येक वर्षाच्या अखेरीस आणि जुलै २०२६ रोजी असलेल्या पाच वर्षांच्या परताव्याचा मागोवा घेतला आहे. बाजारातील परिस्थिती सक्रिय फंडांच्या कामगिरीवर कसा परिणाम करते, हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न आहे.
अॅक्सीस लार्ज अॅण्ड मिडकॅप फंड येत्या ऑक्टोबर महिन्यांत ८ वर्षे पूर्ण करेल. या फंडाची ३० जुन २०२६ रोजी मालमत्ता १६४९६ कोटी होती. या फंडाची धुरा या आधी जीनेश गोपनी यांच्याकडे होती. ते अॅक्सीस म्युच्युअल फंडातून बाहेर पडल्यावर श्रेयस देवलकर यांची निधी व्यवस्थापक म्हणून नेमणूक झाली. या फंडासाठी हितेश दास, मयंक ह्यंकी, आणि कृष्णा एन या त्यांना सहाय्य करतात. हा फंड लार्जकॅप आणि मिडकॅप सोबत परदेशातील कंपन्यांत गुंतवणूक करतो. सध्या या फंडात भारतीय लार्जकॅप (४४%) आणि भारतीय मिडकॅप (३६%) आणि ८ टक्के परकीय गुंतवणूक आहे. अॅक्सीस म्युच्युअल फंडात श्रोडर्स हे भागीदार आहे ते शेअर्स निवडण्याबाबतचा सल्ला देतात. सेबीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ‘लार्ज अँड मिड-कॅप फंडां’ना आपल्या एकूण मालमत्तेपैकी किमान ३५ टक्के गुंतवणूक लार्ज-कॅप शेअर्समध्ये आणि किमान ३५ टक्के गुंतवणूक मिड-कॅप शेअर्समध्ये करणे अनिवार्य असते.उर्वरित ३०% यात ६.९२% परदेशी गुंतवणूक समाविष्ट आहे, तर उर्वरित हिस्सा स्मॉल-कॅप शेअर्स आणि रोख रकमेमध्ये गुंतवला आहे. ‘ॲक्टिव्ह फंड’ म्हणजे बेंचमार्कच्या तुलनेत फंडातील कंपन्याच्या प्रभावातील फरक. ‘निफ्टी लार्ज-मिडकॅप २५० टीआरआय’ मध्ये बऱ्यापैकी विविधता असल्याने, फंड व्यवस्थापकाला ‘ॲक्टिव्ह कंपन्यांचे’ प्रमाण बहुतांश वेळा ५० टक्क्यांच्या वर असते. सोप्या भाषेत सांगायचे तर, कंपन्या आणि उद्योग क्षेत्रांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वेगळे असू शकते. मूल्यांकन किंवा बाजार आवर्तनांमध्ये बदल झाल्यास फंड व्यवस्थापक गुंतवणुकीत फेरबदल (सेक्टर रोटेशन) करतात. बँका, विमा कंपन्या, ग्राहक-केंद्रित कंपन्या आणि निवडक औद्योगिक कंपन्यांमधील वाढलेली गुंतवणूक, तसेच आयटी आणि धातू क्षेत्रातील घटलेली गुंतवणूक, यावरून हे सिद्ध होते. किमान पाच ते सात वर्षांसाठी गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एसआयपी (SIP) द्वारे हा फंड खरेदी करणे योग्य ठरेल. या फंडाची निवड पाच आणि तीन वर्षाचे रोलिंग रिटर्न आणि दीर्घकालीन एसआयपी परतावा, फंड गटातील उच्च मानांकन, सातत्यपूर्ण ‘रोलिंग रिटर्न्स’ यांसारख्या भक्कम बाबींवरून केली आहे. या फंडाचा ‘बेस एक्सपेंस रेशो’ (खर्च प्रमाण) रेग्युलर प्लॅनसाठी १.९२ टक्के आणि डायरेक्ट प्लॅनसाठी ०.९१ टक्के इतका आहे. ‘अॅक्सीस लार्ज अँड मिड कॅप फंड’चा समावेश तुमच्या गुंतवणुकीत ‘कोअर-प्लस’ (मुख्य गुंतवणुकीला पूरक) घटक म्हणून करावा. पोर्टफोलिओमध्ये समतोल राखण्यासाठी या फंडाचा समावेश करणे फायदेशीर ठरेल, कारण सध्या या फंडामध्ये लार्जकॅप आणि मिड-कॅप कंपन्यांचा समतोल साधला आहे. विद्यमान गुंतवणूकदार आपली गुंतवणूक सुरू ठेवू शकतात आणि त्यात टप्प्याटप्प्याने भर घालू शकतात; एकदम मोठी रक्कम गुंतवण्याची चूक करू नये. या फंडाचा परताव्याचा इतिहास समाधानकारक असला, तरी त्यातील चढ-उतार तीव्र असू शकतात. ‘ड्रॉडाउन’चे (गुंतवणुकीच्या उच्चांकी मूल्यापासून झालेली घसरण) विश्लेषण केल्यास असे दिसून येते की, गेल्या पाच वर्षात हा फंड दोनदा १०-१२ टक्क्यांनी घसरला होता. त्यामुळे, दीर्घकालीन दृष्टिकोन आणि एसआयपीचा मार्ग निवडणे अत्यंत आवश्यक आहे. जे गुंतवणूकदार हे चढ-उतार सहन करण्यास तयार आहेत, त्यांच्यासाठी दीर्घकाळातील परताव्याची आकर्षक संधी आहे.

तुमची प्रतिक्रिया किवा प्रश्न विचारण्यासाठी खालिल फॉर्म भरा:

]]>
https://vasantkulkarni.com/large-and-mid-cap-fund/feed/ 0
मनातल्या या पूर्णातल्या अपूर्णाची आस https://vasantkulkarni.com/canara-robaco-large-and-mid-cap-fund/ https://vasantkulkarni.com/canara-robaco-large-and-mid-cap-fund/#respond Sat, 25 Jul 2026 19:39:44 +0000 https://vasantkulkarni.com/?p=8531

मनातल्या या पूर्णातल्या अपूर्णाची आस

वर्ष २०२६चे पहिले सहा महिने नि:संशय स्मॉलकॅपचे राहिले आहे , तर याच काळात मोजक्या लार्जकॅप फंडांची कामगिरी वगळता अन्य लार्जकॅप फंडांची कामगिरी निराशजनक झाल्याचे दिसत आहे . एक वर्ष पूर्ण केलेले ३४ फंड असून केवळ ११ फंडांनी नफा कमविला आहे तर अन्य फंडांना एक वर्षे गुंतवणुकीवर तोटा झाला आहे. लार्ज-कॅप कंपन्यांत ‘व्हॅल्यू-बाइंग’ची (कमी किमतीत चांगल्या शेअर्सची खरेदी) संधी निर्माण झाल्याचे चित्र असले, तरी बाजाराचा अचूक अंदाज वर्तवणे कधीच शक्य नसते. गुंतवणूकदारांना यापैकी कोणत्याही विभागातील तेजीचा लाभ घेता यावा आणि त्याच वेळी एखाद्या विभागाची कामगिरी खालावल्यास होणारे नुकसान मर्यादित ठेवता यावे, यासाठी ‘लार्ज-अँड-मिड-कॅप’ श्रेणीतील फंड्स एक उत्तम पर्याय ठरतात. सेबीच्या नियमांनुसार, लार्ज-अँड-मिड-कॅप फंडांना त्यांच्या पोर्टफोलिओपैकी किमान ३५ टक्के गुंतवणूक लार्ज-कॅप शेअर्समध्ये आणि आणखी ३५ टक्के गुंतवणूक मिड-कॅप शेअर्समध्ये करणे अनिवार्य आहे. गुंतवणूकदार ‘कॅनरा रोबेको लार्ज अॅण्ड मिडकॅप (जुना ‘कॅनरा रोबेको मर्जिंग इक्विटीज’) या फंडाचा विचार करू शकतात. वीस वर्षांपूर्वी हा फंड एक मिड-कॅप फंड म्हणून अस्तित्वात आला. परंतु सेबीने २०१८ मध्ये सुसुत्रीकरणाचे नवीन नियम जाहीर केल्यानंतर, मे २०१८ मध्ये याचे रूपांतर ‘लार्ज-अँड-मिड-कॅप’ श्रेणीत करण्यात आले. पूर्वी मिड-कॅप फंड असल्याने, यात मिड-कॅप शेअर्समध्ये ६५ टक्के किंवा त्याहून अधिक गुंतवणूक केली जात असे, ज्यामुळे जोखीम अधिक होती. २०१८ मधील पुन:र्रचने नंतर लार्ज-अँड-मिड-कॅप फंड योजना झाल्याने गुंतवणुकीतील जोखीम कमी झाली आहे. . ‘लार्ज-कॅप’ समभागांचे भाव वाढत असताना, गेल्या वर्षभरात या फंडाने लार्जकॅप मधील आपली गुंतवणूक ५० टक्क्यांहून अधिक केली आहे. सध्या लार्जकॅपचे प्रमाण ५१.९७ आणि मिडकॅपचे प्रमाण ३५.१७ टक्के राखले आहे. त्यामुळे मध्यम स्वरूपाची जोखीम घेण्याची तयारी असलेल्या गुंतवणूकदारांसाठी हा फंड योग्य आहे. ‘लोकसत्ता कर्ते म्युच्युअल फंड यादीचा मागील १२ वर्षे भाग असलेल्या या फंडाची मागील १८ महिन्यांतील कामागीरी निराशाजनक राहिली आहे. ‘कॅनरा रोबेको लार्ज-अँड-मिड-कॅप’ची सप्टेंबर २०२५ पासून कामगिरी खालावण्यास सुरवात झाली. परिणामी कधीकाळी ‘फाइव्ह स्टार’ रेटिंग असलेल्या फंडाचे रेटिंग खालावून सध्या मॉर्निंगस्टारने ‘थ्री स्टार’ रेटिंग केले आहे. जुन्या गुंतवणूकदारांच्या परताव्यात फारशी घसरण झाली नसली तरी २०२२ नंतर ‘एसआयपी’ला सुरवात केलेल्या गुंतवणूकदारांना तोटा होत आहे. फंड मिडकॅप फंड गटातून लार्ज अँड मिड-कॅप फंड गटात संक्रमित झाल्याने फंडाच्या तुलना-निर्देशांकांत बदल झाला आहे. पूर्वी ‘निफ्टी मिडकॅप इंडेक्स’ हा तुलना निर्देशांक होता, संक्रमणानंतर ‘निफ्टी लार्ज-मिडकॅप २०० टीआरआय’ हा तुलना निर्देशांक निश्चित करण्यात आला. त्याचे भवितव्य आशादायक वाटते. याचे कारण म्हणजे, एक, तीन आणि पाच वर्षांच्या कालावधीत या फंडाचा परतावा हा व्यापक बाजार निर्देशांकांच्या (जसे की निफ्टी ५०० टीआरआय आणि बीएसई ५०० टीआरआय) बरोबरीचा किंवा त्याहून अधिक चांगला राहिला आहे. श्रीदत्त भांडवलदार आणि अमित नांदेकर हे अनुक्रमे निधी व्यवस्थापक आणि सह निधी व्यवस्थापक आहेत.

कॅनरा रोबेको लार्ज अॅण्ड मिडकॅप फंडाची मानदंड सापेक्ष कामगिरी

फंड निर्देशांक
1 वर्षे -२.०३ २.२१
3 वर्षे १२.७३ १४.८६
5 वर्षे ११.२९ १४.२४
7 वर्षे १५.५९ १७.२६
8 वर्षे १३.६१ १५.०१
जरी गेल्या १० महिन्यांत या फंडाची कामगिरी अपेक्षेपेक्षा कमी राहिली असली, तरी ‘रोलिंग रिटर्न’च्या (rolling return) आधारावर तीन आणि पाच वर्षांच्या कालावधीत याची कामगिरी फंड गट सरासरीपेक्षा चांगली राहिली आहे. ‘पॉइंट-टू-पॉइंट रिटर्न’च्या आधारावर (२४ जुलै पर्यंत), तीन, पाच, सात आणि १० वर्षांच्या कालावधीत या फंडाने ‘लार्ज- अँड मिड-कॅप’ श्रेणी आणि ‘S&P BSE Large Mid Cap TRI’ (बेंचमार्क) यांच्यापेक्षा कमी परतावा मिळविला आहे. दीर्घकालीन कालावधीत (पाच, सात आणि १० वर्षे), फंड गट आणि तुलनेत या फंडाने तुलना निर्देशांकाच्या तुलनेत ०.५६ ते ०.९८ टक्के ‘अल्फा’ (अतिरिक्त परतावा) मिळविला आहे.
‘कॅनरा रोबेको लार्ज अॅण्ड मिडकॅप बाजारातील परिस्थितीनुसार लार्जकॅप आणि मिडकॅपचे प्रमाण आणि उद्योग क्षेत्रांची निवड निधी व्यवस्थापक करीत असतात. परंतु फंड लार्ज अॅण्ड मिडकॅप गटात संक्रमित झाल्या नंतर लार्जकॅपचे प्रमाण ५० टक्क्यांहून कमी झालेले नाही. बाजार अस्थिर झाल्यावर हा फंड त्वरित ‘डिफेन्सिव्ह सेक्टर’ मधील गुंतवणूक वाढवतो. अनिश्चित बाजाराचा सामना करण्यासाठी तो ‘कंझ्युमर नॉन-ड्युरेबल्स’ आणि ‘आरोग्यनिगा’ यांसारख्या ‘डिफेन्सिव्ह’ क्षेत्रांची निवड करतो, तर तेजीच्या काळात ‘सायक्लिकल’ (आर्थिक आवर्तनावर निर्धारित असलेली उद्योग क्षेत्रे, जसे की बँका, वाहन, धातू,) क्षेत्रांमधील कंपन्यांच्या समभागांवर भर देतो. मागील तीन वर्षात पोर्टफोलीओतील कंपन्यांची संख्या वाढवून ६५ वरुन ९० वर नेली आहे. त्यातील आघाडीची गुंतवणुक असलेल्या कंपन्यांचे प्रमाण ६.५० ते ३.५० टक्के दरम्यान असते. बँकिंग हे या फंडाचे सर्वाधिक पसंतीचे प्रमुख क्षेत्र आहे. २०१८ मध्ये बँकिंग क्षेत्रातील समभाग समाविष्ट केल्यानंतर आणि जुलै २०१९ पर्यंत त्यातील गुंतवणूक २८-२९ टक्क्यांवर कायम ठेवल्यानंतर, २०२० मध्ये फंडाने या क्षेत्रातील आपली गुंतवणूक काही प्रमाणात कमी केली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपेक्षा खाजगी बँकांना हा फंड अधिक पसंती देतो. सध्या आयसीआयसीआय बँक सर्वात अधिक गुंतवणूक असलेली बँक असून खाजगी बँकांचे प्रमाण १३.४६ टक्के आहे. नेमकी हिच गोष्ट फंडाच्या खराब कामगिरीला कारण ठरली. सार्वजनिक क्षेत्रात्रील बँकांनी भरघोस परतावा दिलेला असतांना सार्वजनिक क्षेत्रातील बँकांत निर्देशांक सापेक्ष कमी गुंतवणूक फंडाच्या घसरलेल्या कामगिरीला कारण ठरलेल्या कारणांपैकी प्रमुख कारण आहे. ग्राहकोपयोगी गैर-टिकाऊ वस्तूंच्या कंपन्यांचे उच्च मूल्यांकन लक्षात घेता, गुंतवणूक कमी झाली आहे. ग्राहकांच्या विवेकी खर्च करण्याच्या क्षमतेत सुधारणा होईल यावर निधी व्यवस्थापकांचा विश्वास असल्याने इंडियन हॉटेल्स, ट्रेंट, इटर्नल युनायटेड स्पिरीटस, जुबिलंट फूड वर्क्स, सारख्या कंपन्या आघाडीच्या गुंतवणुकीत आहेत. निधी व्यवस्थापकांनी पोर्टफोलीओत मोठ्या प्रमाणात बदल केले आहेत. या बदलांचा परिणाम दिसून येण्यास काही कालावधी जावा लागेल, सहा ते आठ महिन्यांत फंडाला गत वैभव प्राप्त होईल अशी आशा वाटते.

पूर्णचंद्र पौर्णिमेचा मनाला मोहवी ।
तेच मन चंद्राचे का कलंक दाखवी?
कुणीच ना बांधू शके मनाचा कयास

आहे मनोहर तरी गमते उदास ।
मनाला या पूर्णातल्या अपूर्णाची आस

अशी गुंतवणूकदारांची अवस्था आहे. एसआयपी खंडित न करता किंवा पैसे काढून न घेता या फंडात गुंतवणूक राखून ठेवण्याची ही शिफारस आहे.

तुमची प्रतिक्रिया किवा प्रश्न विचारण्यासाठी खालिल फॉर्म भरा:

]]>
https://vasantkulkarni.com/canara-robaco-large-and-mid-cap-fund/feed/ 0
आषाढाची पानकळा : बँक ऑफ इंडिया मिड अॅण्ड स्मॉल इक्विटी अॅण्ड डेट फंड https://vasantkulkarni.com/bank-of-india-mid-and-small-equity-debt-fund/ https://vasantkulkarni.com/bank-of-india-mid-and-small-equity-debt-fund/#respond Fri, 17 Jul 2026 09:44:29 +0000 https://vasantkulkarni.com/?p=8524

आषाढाची पानकळा : बँक ऑफ इंडिया मिड अॅण्ड स्मॉल इक्विटी अॅण्ड डेट फंड

समभाग गुंतवणुकीसारखा परतावा आणि बाजारातील अस्थिरतेपासून अंशत: संरक्षण देणाऱ्या एग्रेसिव्ह हायब्रीड फंड हा एक उपयुक्त म्युच्युअल फंड गट आहे. या गटातील फंड त्यांच्या पोर्टफोलिओत ६५-८० टक्के समभाग गुंतवणूक असते, तर उर्वरित रक्कम कर्ज रोख्यांत गुंतवली जाते. तथापि, वेगवेगळ्या फंड घराण्यांच्या एग्रेसिव्ह हायब्रीड फंडांमध्ये एक समानता नसते. मालमत्ता प्राधान्य (लार्जकॅप मिडकॅप) वाटप आणि पोर्टफोलिओ व्यवस्थापन शैलीतील फरक (व्हॅल्यू की ग्रोथ), जोखीम आणि परताव्यामध्ये लक्षणीय तफावत निर्माण होऊ शकते. उदाहरणार्थ, पीजीआयएम इंडिया एग्रेसिव्ह हायब्रीड फंड गेल्या पाच वर्षांत एकूण मालमत्तेच्या सरासरी ६६ टक्के समभाग गुंतवणूक करून सर्वात कमी समभाग गुंतवणूक करणारा एग्रेसीव्ह हायब्रीड फंड ठरला आहे तर ‘एबीएसएल इक्विटी हायब्रीड ९५’ फंड सर्वात जास्त म्हणजे ७५ टक्क्यांहून अधिक समभाग गुंतवणूक करणारा फंड ठरला आहे. श्रीराम एग्रेसिव्ह हायब्रीड फंड आणि नावी एग्रेसिव्ह हायब्रीड फंड विहित मर्यादेत वेगाने मालमत्ता विभाजन करतो. तर मार्केट-कॅप प्राधान्ये देखील तितकीच भिन्न असतात. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल इक्विटी अँड डेट आणि क्वांट एग्रेसिव्ह हायब्रीड हे लार्ज-कॅप्सकडे अधिक झुकलेले आहेत, तर एचएसबीसी एग्रेसिव्ह हायब्रीड फंड आणि जेएम एग्रेसिव्ह हायब्रीड फंड विविध मार्केट कॅपिटलायझेशनचा योग्य समतोल राखतात. बँक ऑफ इंडिया मिड अँड स्मॉल कॅप इक्विटी अँड डेट फंड हा या सर्वांहून पूर्णपणे भिन्न ठरतो. मिड अँड स्मॉल कॅप मध्ये गुंतवणूक करणारा हा एकमेव फंड आहे जो लार्ज-कॅप कंपन्यांतून गुंतवणूक करीत नाही. आपला संपूर्ण इक्विटी पोर्टफोलिओ मिड- आणि स्मॉल-कॅप कंपन्यांमध्ये गुंतवतो. यामुळे हा फंड एकमेव पर्याय ठरतो, जो एग्रेसिव्ह हायब्रीड रचनेमुळे बाजार घसरणीपासूनच्या संरक्षणासोबतच, फक्त मिड- आणि स्मॉल-कॅप धोरणाची उच्च-वाढ आणि उच्च-अस्थिरतेची (हाय रिस्क हाय रिटर्न) वैशिष्ट्येही देतो. गेल्या दहा वर्षात फंडाच्या मिड- आणि स्मॉल-कॅपवर लक्ष केंद्रित करण्याचे चांगले परिणाम दिसले आहेत. कोणत्याही लार्ज-कॅप कंपनीत गुंतवणूक नसल्याने, बाजारातील मंदीच्या काळात तो बहुतेक हायब्रीड पर्यायांपेक्षा अधिक अस्थिर असतो. त्यामुळे, हायब्रीड गुंतवणुकीतून स्थिरता शोधणाऱ्या गुंतवणूकदारांऐवजी, जास्त जोखीम घेण्याची क्षमता आणि दीर्घकालीन एसआयपी गुंतवणुक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी तो अधिक योग्य पर्याय आहे. बँक ऑफ इंडिया मिड अॅण्ड स्मॉल इक्विटी अॅण्ड डेट फंडाने ५ जुलै रोजी १० वर्षे पूर्ण केली. या दहा वर्षात (५ जुलै २०१६ ते ३ जुलै २०२६) दरम्यान फंडाने वार्षिक १४.८८ टक्के दराने परतावा दिला आहे. १५५१ कोटींच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करणारा हा फंड १० वर्षे कालावधीत दुसऱ्या क्रमांकावर असून या फंडाचा परतावा दहा वर्षे कालवधीतील अनेक इक्विटी फंडांपेक्षा अधिक आहे. मालमत्ता क्रमवारीत हे ही मालमत्ता व्यवस्थापन कंपनी आघाडीच्या दहा किंवा पंधरा क्रमांकात नसली तरी या कंपनीचे अनेक फंड जसे की फ्लेक्झीकॅप स्मॉलकॅप इएलएसएस मल्टीकॅप फंड कामगिरी क्रमवारीत वरच्या स्थानी आहेत. बँक ऑफ इंडिया मिड अॅण्ड स्मॉल इक्विटी अॅण्ड डेट फंडाला मॉर्निंगस्टारने ‘फाईव्ह स्टार रेटिंग’ दिले आहे.
गेल्या पाच वर्षांत, (साधारण एप्रिल २०२१ नंतर) फंडाने आपल्या पोर्टफोलिओचा ७०-७८ टक्के हिस्सा कंपन्यांच्या समभागात गुंतविला होता. तर उर्वरित २५ टक्के हिस्सा रोखे गुंतवणूकीत ठेवला होता. समभाग गुंतवणुकीचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे फंडाच्या प्रकाश टाकला आहे.) नांवाप्रमाणे लार्ज-कॅप कंपन्यांत कमी गुंतवणूक करून समभाग गुंतवणुकीपैकी ८० टक्के पोर्टफोलिओ मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप कंपन्यांत गुंतविला. गेल्या वर्षभरात फंडाने मिड-कॅपमधील गुंतवणूक एकूण मालमत्तेच्या ४० टक्क्यांवरून ४६ टक्क्यांपर्यंत (जून २०२६ पर्यंत) वाढवली आहे, कारण फंड व्यवस्थापकाला या विभागातील मूल्यांकन अधिक आकर्षक वाटले. (लोकसत्ता ऑन लाईनवर मालमत्ता व्यवस्थापन कंपनीचे मुख्य गुंतवणूक अधिकारी अलोक सिंग यांची मुलाखत नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. त्यात त्यांनी ‘ट्रु टू लेबल’वर प्रकाश टाकला आहे). गेल्या पाच वर्षांत, फंडाने सरासरी सुमारे ४५ टक्के मिड-कॅपमध्ये आणि ३१ टक्के स्मॉल-कॅपमध्ये गुंतवले आहेत. स्मॉल-कॅपच्या निवडीमध्ये निधी व्यवस्थापकांनी गुणवत्तेचे कठोर निकष लागू केले आहेत. एक हजार कोटींपेक्षा कमी बाजार भांडवली मूल्य असलेल्या कंपन्यांचा समावेश गुंतवणुकीत होत नाही. सुदृढ ताळेबंद असलेल्या व्यवसायांना हा फंड गुंतवणुकीसाठी प्राधान्य देतो. रोकड सुलभतेशी निगडीत जोखीम व्यवस्थापित करण्यासाठी, पोर्टफोलिओचा ८० टक्के भागाची कामकाजाच्या सहा दिवसांत विक्री करता येईल अशा कंपन्यांची स्मॉल-कॅप कंपन्यांतील गुंतवणूक ३ टक्क्यांपर्यंत सीमित ठेवण्यात येते. हा फंड, बदलत्या वातावरणाशी गुंतवणूक जुळवून घेण्याचे धोरण अवलंबीतो, आणि कंपनी-विशिष्ट, उद्योग, धोरण किंवा आर्थिक घडामोडींचा फायदा होणाऱ्या व्यवसायांचा शोध घेतो. गुंतवणूक करण्यापूर्वी, तो बदलाच्या टिकाऊपणाचे मूल्यांकन करतो आणि व्यवस्थापनाची गुणवत्ता, कंपनी अनुपालन इत्यादी मानके आणि व्यवसायाची मूलभूत तत्त्वे यांची कठोर तपासणी केल्या पश्चात गुंतवणुकीचा निर्णय होतो. कंपन्यांची निवड प्रमुख मानदंडांमध्ये स्वनिधी परतावा (रिटर्न ऑन इक्विटी), रोख प्रवाहाची ताकद, व्यवसायाचा टिकाऊपणा आणि स्पर्धात्मक फायदे यांचा समावेश आहे. गेल्या दोन वर्षांपासून, सरकारी मालकीच्या कंपन्यांच्या भांडवली खर्चाच्या अनुषंगाने, पोर्टफोलिओ देशांतर्गत संकल्पनांकडे झुकलेला आहे. भांडवली वस्तू, धातू, ऊर्जा आणि आरोग्यसेवा या क्षेत्रांमध्ये त्याची गुंतवणूक अधिक आहे, तर बँकांच्या बाबतीत तटस्थता (निर्देशांकातील प्रमाणाइतकीच गुंतवणूक) राखली आहे. जागतिक अनिश्चिततेबद्दलच्या चिंतेमुळे, माहिती तंत्रज्ञान आणि तेल व वायू क्षेत्रांमध्ये फंडाची गुंतवणूक कमी आहे.

गेल्या पाच वर्षांत, (साधारण एप्रिल २०२१ नंतर) फंडाने आपल्या पोर्टफोलिओचा ७०-७८ टक्के हिस्सा कंपन्यांच्या समभागात गुंतविला होता. तर उर्वरित २५ टक्के हिस्सा रोखे गुंतवणूकीत ठेवला होता. समभाग गुंतवणुकीचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे फंडाच्या प्रकाश टाकला आहे.) नांवाप्रमाणे लार्ज-कॅप कंपन्यांत कमी गुंतवणूक करून समभाग गुंतवणुकीपैकी ८० टक्के पोर्टफोलिओ मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप कंपन्यांत गुंतविला. गेल्या वर्षभरात फंडाने मिड-कॅपमधील गुंतवणूक एकूण मालमत्तेच्या ४० टक्क्यांवरून ४६ टक्क्यांपर्यंत (जून २०२६ पर्यंत) वाढवली आहे, कारण फंड व्यवस्थापकाला या विभागातील मूल्यांकन अधिक आकर्षक वाटले. (लोकसत्ता ऑन लाईनवर मालमत्ता व्यवस्थापन कंपनीचे मुख्य गुंतवणूक अधिकारी अलोक सिंग यांची मुलाखत नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. त्यात त्यांनी ‘ट्रु टू लेबल’वर प्रकाश टाकला आहे). गेल्या पाच वर्षांत, फंडाने सरासरी सुमारे ४५ टक्के मिड-कॅपमध्ये आणि ३१ टक्के स्मॉल-कॅपमध्ये गुंतवले आहेत. स्मॉल-कॅपच्या निवडीमध्ये निधी व्यवस्थापकांनी गुणवत्तेचे कठोर निकष लागू केले आहेत. एक हजार कोटींपेक्षा कमी बाजार भांडवली मूल्य असलेल्या कंपन्यांचा समावेश गुंतवणुकीत होत नाही. सुदृढ ताळेबंद असलेल्या व्यवसायांना हा फंड गुंतवणुकीसाठी प्राधान्य देतो. रोकड सुलभतेशी निगडीत जोखीम व्यवस्थापित करण्यासाठी, पोर्टफोलिओचा ८० टक्के भागाची कामकाजाच्या सहा दिवसांत विक्री करता येईल अशा कंपन्यांची स्मॉल-कॅप कंपन्यांतील गुंतवणूक ३ टक्क्यांपर्यंत सीमित ठेवण्यात येते. हा फंड, बदलत्या वातावरणाशी गुंतवणूक जुळवून घेण्याचे धोरण अवलंबीतो, आणि कंपनी-विशिष्ट, उद्योग, धोरण किंवा आर्थिक घडामोडींचा फायदा होणाऱ्या व्यवसायांचा शोध घेतो. गुंतवणूक करण्यापूर्वी, तो बदलाच्या टिकाऊपणाचे मूल्यांकन करतो आणि व्यवस्थापनाची गुणवत्ता, कंपनी अनुपालन इत्यादी मानके आणि व्यवसायाची मूलभूत तत्त्वे यांची कठोर तपासणी केल्या पश्चात गुंतवणुकीचा निर्णय होतो. कंपन्यांची निवड प्रमुख मानदंडांमध्ये स्वनिधी परतावा (रिटर्न ऑन इक्विटी), रोख प्रवाहाची ताकद, व्यवसायाचा टिकाऊपणा आणि स्पर्धात्मक फायदे यांचा समावेश आहे. गेल्या दोन वर्षांपासून, सरकारी मालकीच्या कंपन्यांच्या भांडवली खर्चाच्या अनुषंगाने, पोर्टफोलिओ देशांतर्गत संकल्पनांकडे झुकलेला आहे. भांडवली वस्तू, धातू, ऊर्जा आणि आरोग्यसेवा या क्षेत्रांमध्ये त्याची गुंतवणूक अधिक आहे, तर बँकांच्या बाबतीत तटस्थता (निर्देशांकातील प्रमाणाइतकीच गुंतवणूक) राखली आहे. जागतिक अनिश्चिततेबद्दलच्या चिंतेमुळे, माहिती तंत्रज्ञान आणि तेल व वायू क्षेत्रांमध्ये फंडाची गुंतवणूक कमी आहे.

मे महिन्याच्या गुंतवणूक प्रकटीकरणानुसार, (फंड फॅक्ट शीट) शीर्ष तीन क्षेत्रे आरोग्य निगा (१०.४ टक्के), विद्युत उपकरणे (६.७ टक्के) आणि लोहधातू (५.७ टक्के) ही होती. गेल्या वर्षभरात, फंडाने औषधनिर्माण, विद्युत उपकरणे आणि विमा यांमधील वाटप ३-५ टक्क्यांनी वाढवले, तर माहिती तंत्रज्ञानातून पूर्णपणे बाहेर पडले आणि लोह धातू व भांडवली बाजारांमधील गुंतवणूक कमी केली.

या फंडाची ‘रोखे गुंतवणूक’ जोखीम नियंत्रणावर ठाम आहे. गुंतवणूक जोखीम नियंत्रित करून व्यवस्थापित केली जाते. समभाग आणि डेट अशा दोन्ही घटकांचे व्यवस्थापन करणारे आलोक सिंग यांच्या देखरेखीखाली, हा फंड प्रामुख्याने कमी मुदतीच्या आणि उच्च पतमानांकन असलेल्या रोख्यांत गुंतवणूक करतो. विशेषतः ‘ट्रिपल ए’ आणि ‘डबल ए प्लस’ मानांकन असलेल्या रोख्यांना प्राधान्य दिले जाते.

रोख्यांतील गुंतवणूक ही परतावा वाढवण्याचे मुख्य साधन नसून, ती पोर्टफोलिओला स्थैर्य देण्याचे काम करते; यामुळे ‘मिड-कॅप’ आणि ‘स्मॉल-कॅप’ पोर्टफोलिओमुळे निर्माण होणारी अतिरिक्त अस्थिरता मर्यादित ठेवण्यास रोखे गुंतवणूक मदत करते. जून २०२६ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, पोर्टफोलिओपैकी सुमारे २ टक्के गुंतवणूक सरकारी रोख्यांमध्ये आणि १३ टक्के गुंतवणूक ‘ट्रिपल ए’ मानांकन असलेल्या रोख्यांमध्ये होती. तसेच, वेदांता, नुवोको विस्टास, बिर्ला कॉर्पोरेशन आणि ३६० वन प्राइम यांनी विकलेल्या ‘डबल ए ‘ मानांकन असलेल्या रोख्यांमध्ये १ टक्क्यापेक्षा कमी गुंतवणूक करण्यात आली आहे.

बाजारातील २०२१ मधल्या तेजीदम्यान फंडाने चांगला नफा मिळवून एग्रीसिव्ह हायब्रीड फंड गटात आपला दबदबा कारं राखला होता. तथापि, मिड- आणि स्मॉल-कॅप समभागांच्या गुंतवणुकीमुळे ते बाजारातील घसरणी दरम्यान अतिअस्थिर बनले, ज्यामुळे सप्टेंबर २०२४ -मार्च २०२५ दरम्यान फंडाची कामगिरी खराब झाली. तरीही, फंडाच्या दीर्घकालीन कामगिरीचा इतिहास प्रभावी राहिला आहे. गेल्या दहा वर्षातील पाच वर्षांचे रोलिंग रिटर्न १६ टक्के तर तीन वर्षाचे रोलिंग रिटर्न १८ टक्के आहेत. ही आकडेवारी फंड गटाच्या सरासरीपेक्षा खूप अधिक आहे. आषाढात सर्वात जास्त पाउस पडतो. येत्या बुधवार पासून आषाढाला सुरवात होत आहे

कवी ना.धो.महानोरांच्या शब्दांत सांगायचं तर

आषाढाला पानकळा,

सृष्टी लावण्याचा मळा

दुःख भिरकावून येती,

शब्द माहेरपणाला,

नवा गांधार जिण्याला ,

कवितेतील या ओळी प्रमाणेच आपला पोर्टफोलीओ हिरव्या लावण्याने फुलविण्यासाठी गुंतवणूकदारांनी या फंडाचा आपल्या गुंतवणुकीत आवर्जून समावेश करण्याची ही शिफारस.

तुमची प्रतिक्रिया किवा प्रश्न विचारण्यासाठी खालिल फॉर्म भरा:

]]>
https://vasantkulkarni.com/bank-of-india-mid-and-small-equity-debt-fund/feed/ 0
रंग माझा वेगळा https://vasantkulkarni.com/tata-multi-sector-passivef-unds/ https://vasantkulkarni.com/tata-multi-sector-passivef-unds/#respond Mon, 06 Jul 2026 08:53:51 +0000 https://vasantkulkarni.com/?p=8516

रंग माझा वेगळा

टाटा मल्टीसेक्टर पॅसिव्ह फंड्स ऑफ फंडाच्या एनएफओमध्ये गुंतवणूक करावी का?
एखाद्या उद्योग क्षेत्रात गुंतवणूक आकर्षक वाटू शकले तरी उद्योग क्षेत्र निवडण्यात चूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गुंतवणूकदार अनेकदा एखादे उद्योग क्षेत्र तेजीत असताना (किंबहुना शिखारावर असतांना) त्यात गुंतवणूक करतात आणि जेव्हा शिखरावरून खालच्या दिशेला उद्योग चक्राचा प्रवास सुरु होतो, तेव्हा गुंतवणूक काढून घेतात असे नाही. टाटा मल्टी सेक्टर पॅसिव्ह फंड्स ऑफ फंड्स ऑफ फंड ही समस्या वेगळ्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करेल . फंड-ऑफ-फंड्स (एफओएफ) रचनेचा वापर करून निष्क्रिय (पॅसिव्ह) देशांतर्गत उद्योग क्षेत्रातील समभाग गुंतवणूक एक्सचेंज ट्रेडेड फंड्स (ईटीएफ)च्या माधमातून केले जाईल. हे बाजारातील आवर्तन , मूल्यांकन आणि समष्टी आर्थिक संकेतांनुसार मालमत्ता वाटप बदलेल. फंडाचा एनएफओ २२ जून रोजी सुरु झाला असून ६ जुलै पर्यंत सुरु राहील. टाटा म्युच्युअल फंडाचे विविध पॅसिव्ह सेक्टरल फंड असून (उदाहरणार्थ टाटा निफ्टी ऑटो इंडेक्स फंड, टाटा इंडिया डिजिटल इटीएफ) गेल्या काही वर्षांत, फंड घराण्याच्या या निष्क्रिय फंडांनी चांगली कामगिरी केली आहे. मानवी भावना, ताज्या घडामोडींचा प्रभाव आणि बाजारातील अल्पकालीन अस्थिरतेच प्रभाव कमी करणे, हा यामागील उद्देश आहे. ज्या गुंतवणूकदारांना सेक्टरल फंडात गुंतवणूक करायची आहे, परंतु गुंतवणूक केवळ माध्यमातील बातम्यांच्या आधारे न करता ‘डेटा ड्रिव्हन’ पद्धतीने करायची आहे, त्यांच्यासाठी हा एनएफओ एक शिस्तबद्ध ‘सॅटेलाइट असेट अलोकेशन’ म्हणून काम करू शकतो. महत्त्वाचे म्हणजे, याला डायव्हर्सिफाइड इक्विटी फंडाचा पर्याय म्हणून न पाहता, दीर्घकालीन पोर्टफोलीओची ‘सेक्टर-रोटेशन’ पद्धत म्हणून पाहिले पाहिजे. टाटा मल्टीसेक्टर पॅसिव्ह फंड्स ऑफ फंडाची ‘सेक्टर वेट्स’ एका संरचित, भविष्याचा वेध घेणाऱ्या प्रारूपाद्वारे ठरवले जातील. हा फंड उद्योगांचा प्रभाव सक्रिय व्यवस्थापित करेल तर प्रत्यक्ष गुंतवणुकीसाठी निष्क्रिय फंडांचा साधन म्हणून वापर करेल. फंड व्यवस्थापक मूल्यांकनानुसार आणि स्थूल-आर्थिक परिस्थिती, संबंधित क्षेत्रांचा मूलभूत संशोधन आणि गती (मुमेंटम)इत्यादी घटकांसारख्या मापदंडांवर विसंबून मालमत्तेचे क्षेत्रीय निष्क्रिय फंडात वाटप करेल. विविध क्षेत्रांच्या विकासाचे चालक घटक समजून घेण्यासाठी फंड मॅनेजर आर्थिक परिस्थिती, बाजाराची परिस्थिती आणि भविष्यातील दृष्टिकोनाचे मूल्यांकन करण्याचा प्रयत्न करेल. ‘निफ्टी ५०० इंडेक्स टीआरआय हा या फंडाचा मान दंड असून राहुल सिंग हे या फंडाचे नियुक्त निधी व्यवस्थापक आहेत.

जरी हा फंड प्रामुख्याने टाटा म्युच्युअल फंडाच्या फंडात गुंतवणूक करेल, तरीही तिला इतर म्युच्युअल फंड घराण्यांच्या पॅसिव्ह फंडात गुंतवणूक करण्याची मुभा असेल. हा फंड रोखे आणि मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट्समध्ये देखील गुंतवणूक करू शकते, ज्यामध्ये रिव्हर्स रेपो, सरकारी रोखे किंवा ट्रेझरी बिलांवरील ट्रायपार्टी रेपो आणि/किंवा मालमत्ता वाटप विभागात वर नमूद केलेल्या इतर तत्सम साधनांचा समावेश आहे.

पोर्टफोलिओ मंथन: योजनेतील पोर्टफोलिओचे मंथन बाजारातील संधींवर अवलंबून असेल. पोर्टफोलिओमधील संभाव्य उलाढालीचा अचूक अंदाज लावणे कठीण आहे. म्युच्युअल फंड आणि त्याच्याशी संबंधित व्यवस्थापन खर्च लक्षात घेऊन, जोखीम-समायोजित परतावा मिळविण्यासाठी पोर्टफोलिओ मंथन इष्टतम करण्याचा प्रयत्न करेल. अधिक पोर्टफोलिओ मंथन हे पोर्टफोलिओच्या कामगिरीवर नकारात्मक परिणाम करतोच असे नाही आणि तो बाजारात उपलब्ध असलेल्या गुंतवणुकीच्या संधींचे निदर्शक असू शकतो. फंड ऑफ फंड्स फंडांना पोर्टफोलिओ मंथनाचा नियम लागू होत नाही.

धोरण: टाटा मल्टीसेक्टर पॅसिव्ह फंड्स ऑफ फंडाच्या विविध सेक्टर ईटीएफ / पॅसिव्ह फंडातील गुंतवणूक निश्चित नाही. आर्थिक पार्श्वभूमी आणि बाजारातील संकेतांनुसार ही गुंतवणूक सेक्टर ईटीएफमध्ये बदलते. बाजार सुधारणा, विस्तार, चक्राच्या आकंचन टप्प्याची स्थिती किंवा मंदीच्या टप्प्यातून जात आहे का, याचे मूल्यांकन करण्यासाठी वाढ, दर, महागाई, कमाईचे कल आणि मूल्यांकन यांचा मागोवा घेतला जातो. याचा उद्देश सर्व चक्रांमध्ये सक्रीय राहणे हा आहे. याचा अर्थ असा की, सुरुवातीच्या सुधारणा आणि विस्ताराच्या काळात ते चक्रीय क्षेत्रांमध्ये (उदाहरणार्थ, ऊर्जा) गुंतवणूक वाढवू शकते, अनिश्चितता किंवा मंदीच्या काळात बचावात्मक गुंतवणूक (उदा. आयटी, फार्मा) वाढवू शकते, आणि ज्या क्षेत्रांमध्ये मूल्यांकन मूलभूत मूल्यांपेक्षा जास्त आहे अशा अतिउत्साही क्षेत्रांमधील गुंतवणूक कमी करू शकते. मूल्यांकन हा फंडाच्या मालमत्ता वाटप पद्धतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. हा फंड केवळ क्षेत्राच्या अलीकडील कामगिरीवर अवलंबून न राहता, अशा क्षेत्रांचा शोध घेते जिथे जोखमीच्या तुलनेत संभाव्य वाढ आकर्षक वाटते. तसेच, ते विविध क्षेत्रांमध्ये आणि बाजार भांडवली विभागांमध्ये गुंतवणूक करू शकते.
‘यु हॅव टू बी अॅक्टीव्ह इन पॅसिव्ह फंड्स अॅण्ड पॅसिव्ह इन अॅक्टीव्ह फंड्स’ असे एक वचन आहे. “सक्रिय” असणे म्हणजे केवळ एक इंडेक्स फंड किंवा ईटीएफ निवडून त्याला विसरून जाण्याऐवजी, तुमच्या पोर्टफोलिओसाठी पॅसिव्ह फंड निवडणे, आणि त्याचे व्यवस्थापन करणे. तुम्ही मालमत्ता वाटपावर सक्रियपणे नियंत्रण ठेवता, बाजारात बदल झाल्यावर पोर्टफोलिओचे पुनर्संतुलन करता आणि मूळ निर्देशांक अजूनही तुमच्या आर्थिक उद्दिष्टांशी जुळतात की नाही याचा नियमितपणे आढावा घेणे आवश्यक आहे. तुमच्या पॅसिव्ह गुंतवणुकीमध्ये सक्रिय राहण्यासाठी, या सुवाचानाचे पालन करा. धोरणात्मक मालमत्ता वाटपासाठी केवळ एकच इंडेक्स फंड निवडणे चुकीचे आहे. तुमच्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार, तुमचे भांडवल वेगवेगळ्या मालमत्ता वर्गांमध्ये (उदा. लार्ज-कॅप, मिड-कॅप आणि आंतरराष्ट्रीय निर्देशांक) कसे विभाजित करायचे हे ठरवा. कालांतराने, काही निर्देशांक इतरांपेक्षा वेगाने वाढतील, ज्यामुळे तुमच्या पोर्टफोलिओचे अपेक्षित प्रमाण विचलित होईल. तुमचे मालमत्ता विभाजन कायम ठेवण्यासाठी, जास्त परतावा देणारे फंड सक्रियपणे कमी करा आणि कमी परतावा देणाऱ्या फंडांमध्ये पुन्हा गुंतवणूक करा. निर्देशांकाचा आढावा घ्या. सर्व निर्देशांक एकाच दराने वाढत किंवा घटत नाहीत. तुमचा फंड ज्या निर्देशांकाचा मागोवा घेतो (उदा. निफ्टी ५०, एस अँड पी ५००), तो अजूनही तुमच्या गुंतवणुकीच्या कालावधीसाठी उपयुक्त आहे आणि त्याच्या क्षेत्रीय भारांमध्ये कोणताही बदल झालेला नाही, याची खात्री करा. ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह या दोन्ही प्रकारच्या फंडांचा वापर करा. तुम्ही “कोअर आणि सॅटेलाइट” धोरण अवलंबू शकता. कमी खर्चाचा पॅसिव्ह फंड तुमचा स्थिर कोअर म्हणून कसा काम करतो, तर ॲक्टिव्ह फंड सॅटेलाइट म्हणून काम करून तुमचा अल्फा कसा वाढवू शकतात, हे लवकरच विविध उदाहरणांच्या सहाय्याने लवकरच समजून घेऊ.

तुमची प्रतिक्रिया किवा प्रश्न विचारण्यासाठी खालिल फॉर्म भरा:

]]>
https://vasantkulkarni.com/tata-multi-sector-passivef-unds/feed/ 0
हिच ती वेळ… https://vasantkulkarni.com/debt-mutual-fund-2/ https://vasantkulkarni.com/debt-mutual-fund-2/#respond Tue, 16 Jun 2026 09:05:25 +0000 https://vasantkulkarni.com/?p=8507

हिच ती वेळ…

सामान्य गुंतवणूकदारांना रोखे गुंतवणूक करणारे फंड (डेट म्युच्युअल फंड) आवडत नाहीत कारण ते समभाग गुंतवणुकीच्या तुलनेत अतिशय कमी परतावा देतात. बँकांच्या मुदत ठेवीं मुद्दलाची हमी देतात तर डेट म्युच्युअल फंडांचा परतावा बाजार जोखमीशी निगडीत असतो. डेट फंडांना व्याजदर चढ उतार (ड्यूरेशन रिस्क) आणि पत जोखमींना (क्रेडीट रिस्क) सामोरे जावे लागते. अनेक गुंतवणूकदार डेट फंडांना मुदत ठेवी समजण्याची चूक करतात. तथापि, त्यांचे निव्वळ मालमत्ता मूल्य (NAV) बाजारातील अस्थिरतेनुसार दररोज कमी जास्त होतात. याचा अर्थ डेट फंडातील गुंतवणूकदारांना तोट्याला सामोरे जावे लागण्याची शक्यता असते. रोख्यांच्या किमती आणि व्याजदर यांचा व्यस्त संबंध असतो. जर मध्यवर्ती बँकेने दर वाढवले, तर विद्यमान रोख्यांच्या किमती घसरतात, ज्यामुळे फंडाचे मूल्य कमी होते. याव्यतिरिक्त, जर एखादी कंपनी तिने घेतलेल्या कर्जावरचे व्याज देण्यास एक दिवस जरी विलंब झाला तरी रोख्यांचे ‘क्रेडिट रेटिंग’ घसरण्याचा किंवा कंपनी दिवाळखोर होण्याचा सतत धोका असतो. ज्या देशात ८० टक्के आयफोन, ७० टक्के प्रवासी वाहने, आणि ८५ टक्के घरे कर्ज काढून घेतली जातात, त्या देशात या सर्व कर्जांचे डेट फंड अंशत: लाभार्थी आहेत. तरी सुद्ध अर्थनिरक्षरतेमुळे गुंतवणूकदारांचा कल डेट फंडातील गुंतवणूक टाळण्याकडे असतो हे दुर्दैव.
जर तुम्हाला तुमच्या डेट फंडमध्ये सुरक्षितता आणि पुढील परताव्याचा अंदाज लावता येण्याजोगी गुंतवणूक धोरण या दोन गोष्टी हव्या असतील तर टेन यिअर कॉंस्टंट मॅच्युरीटी फंड हा एक चांगला विकल्प आहे. बहुतेक डेट फंडांमध्ये दोन पैकी (क्रेडीट रिस्क किंवा ड्यूरेशन रिस्क) यापैकी एखादीच गोष्ट असते. जे फंड ‘क्रेडिट रिस्क’ (डायनॅमीक बॉंड फंड, कॉरपोरेट बॉंड फंड मिडीयम ड्यूरेशन फंड वैगरे) घेत नाहीत, त्यांच्यातही पोर्टफोलिओच्या मॅच्युरिटी कालावधीतील बदल आणि अनपेक्षित घटनांचा परिणाम होऊ शकतो. जर तुम्हाला असा पर्याय हवा असेल जिथे अजिबात क्रेडिट रिस्क’ अजिबात नसल्याने ‘टेन यिअर कॉंस्टंट मॅच्युरीटी’ हा फंड प्रकार निवडा. टेन यिअर कॉंस्टंट मॅच्युरीटी फंडात केवळ पाच विकल्प उपलब्ध आहेत.
फंडफंडाची सुरवातफंडाची मालमात्त (कोटी)मागील एक वर्षाचा परतावा
बंधन गिल्ट फंड विथ 10 यिअर्स कॉन्स्टंट ड्युरेशन०९-०३-२००२२२५६२.२७
डीएसपी 10 यिअर्स जी सेक फंड  १७-०९-२०१४४८.३३०.१८
आयसीआयसीआय पृ. कॉन्स्टंट मॅच्युरीटी गिल्ट   ०१-०९-२०१४२२५६.३१.७९
एसबीआय कॉन्स्टंट मॅच्युरिटी 10 इयर गिल्ट फंड२३-१२-२०००१६४३.४१.
युटीआय गिल्ट फंड  10 यिअर्स कॉन्स्टंट मॅच्युरीटी०१-०८-२०२२१२३.८६०.८६

(क्रमवारी इंग्रजी आद्याक्षरानुसार)

‘एसबीआय मॅग्नम कॉन्स्टंट मॅच्युरिटी’ हा या फंड गटातील सर्वात जुना फंड आहे. हा फंड केवळ सरकारी रोख्यांमध्ये (जी-सेक) गुंतवणूक करतो, म्हणजेच यात पत विषयक शुन्य असते. हा फंड ८ ते ११ वर्षे मुदतीच्या रोख्यांत अशी गुंतवणूक करतो जेणे करून पोर्टफोलिओ उर्वरित कालावधी सरासरी १० वर्षांचा राहील यामुळे वेगवेगळ्या कालावधीचे निर्णय घेण्याची चूक होण्याची शक्यता टाळली जाते. ‘एसबीआय मॅग्नम कॉन्स्टंट मॅच्युरिटी’ हा फंड ५ वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीच्या मुदत ठेवींसाठी पर्याय ठरू शकतो. केंद्र सरकारच्या रोख्यांत गुंतवणुकीसाठी रिझर्व्ह बँकेने ‘आरबीआय रिटेल डिरेक्ट’ ही सुवीध उपलब्ध करून दिली असली तरी . सामान्य गुंतवणूकदारांसाठी सरकारी रोख्यांमध्ये थेट गुंतवणूक करणे अजूनही कठीण आहे. या फंडात गुंतवणू करणे म्हणजे केंद्र सरकारच्या १० वर्षे मुदतीच्या रोख्यंत गुंतवणूक करण्यासारखे आहे. याच कारणामुळे ‘एसबीआय कॉन्स्टंट मॅच्युरिटी’ फंडाची शिफारस दीर्घकालीन पोर्टफोलिओसाठी करत आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे ५ ते ७ वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या गुंतवणुकीत डेट फंडाची भूमिका केवळ सुरक्षितता प्रदान करणे आणि रोकड सुलभता देणे ही असते. सध्याच्या परीस्थित या आधीच्या लेखांशी विसंगत वाटू शकते, कारण सध्या दीर्घ कालावधीच्या मिडीयम टू लॉंग ड्युरेशन आणि लॉंग ड्युरेशन रोखे गुंतवणूक करण्यापेक्षा शॉर्ट ड्युरेशनआणि ओव्हर नाईट फंड चांगला परतावा देत आहेत. हे विधान प्रामुख्याने अशा गुंतवणूकदारांसाठी आहे ज्यांचा गुंतवणुकीचा कालावधी ५ वर्षांपेक्षा कमी आहे. मालमत्ता विभाजनावर विश्वास असणाऱ्या गुंतवणूकदारांनी या फंडाचा आवर्जून विचार करावा.
हा फंड पूर्वी शॉर्ट-टर्म गिल्ट फंड म्हणून ओळखला जात असे. सेबीच्या २०१८ मधील नवीन वर्गीकरणानंतर या फंडाचे नांव आणि रणनीती कॉन्स्टंट मॅच्युरिटी फंड म्हणून ओळखला जावू लागला. एप्रिल २०१८ पासून त्याचा सरासरी १-वर्षाचा परतावा ९.९% आहे, जो केवळ बंधन जी-सेक १० यिअरस कॉन्स्टंट मॅच्युरिटी फंडापेक्षा कमी आहे. एक वर्षाच्या परताव्याच्या क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेला हा फंड डीएसपी आणि आयसीआयसीआय फंडांच्या विपरीत (व्याज दर वाढीच्या) कालावधीत, तोटा झालेला नाही. अस्थिरतेच्या बाबतीतही, एसबीआय कॉन्स्टंट मॅच्युरिटी अन्य स्पर्धकांपेक्षा कमी अस्थिर असलेला फंड आहे. एसबीआय कॉन्स्टंट मॅच्युरिटीचे कमी प्रमाणित विचलन त्याला उच्च जोखीम-समायोजित परतावा देते. एसबीआय कॉन्स्टंट मॅच्युरिटी फंड सेवानिवृत्ती नियोजन सारख्या दीर्घकालीन वित्तीय उद्दिष्टांसाठी योग्य आहे. परंतु, त्याचा वापर केवळ ५ वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीसाठीच केला पाहिजे. दीर्घ मुदतीचे सरकारी रोखे कमी कालावधीत जास्त अस्थिर असतात परिणामी १ ते ३ वर्षे कालावधीत गुंतवणुकीवर तोटा होण्याची शक्यता आहे.
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना ‘भूतकाळातील कामगिरी कितीही चांगली असली तरी भविष्यातील यशाची कोणतीही हमी देत नाही’ हा वैधानिक इशारा दिला जातो. हा इशारा देण्यामागे एखाद्या फंडाच्या पराताव्यावर हुरळून जावून गुंतवणूक करू नका हा गर्भित अर्थ आहे. परंतु गुंतवणूकदार त्या कामगिरीच्या आकडेवारीकडे आकर्षित होऊन गुंतवणूक करण्यापासून स्वतःला रोखू शकत नाहीत. सध्या डेट फंडांचा परतावा सोन्याच्या परताव्याने झाकोळला गेला असल्याने वैविध्य साधण्यासाठी डेट फंडाऐवजी मल्टी असेट फंडांचा वापर केला जातो. रोखे गुंतवणूक जणू विस्मृतीत गेलेला मालमत्ता वर्ग झाला आहे. इंग्रजीत ‘बॅक टू बेसिक’ अशी संकल्पान सांगितली जाते. मुलभूत गोष्टी न विसरणे असा संकल्पनेच अर्थ आहे. रोखे आणि समभाग हे मूळ मालमत्ता वर्ग असून यांचा वापर वैविध्य साधण्याकरिता केला पाहिजे. सध्याचा डेट फंडांचा परतावा ४-५ टक्क्यांपेक्षा कमी आहे. गुंतवणुकीची योग्य वेळ आणि योग्य फंड प्रकार निवडल्यास बँक मुदत ठेवींपेक्षा अधिक परतावा मिळाला असल्याचा इतिहास आहे. म्हणूनच डेट फंडात नव्याने गुंतवणूक करण्याची हिच ती वेळ आहे.
$परताव्याची ही सर्व आकडेवारी ‘पराग पारिख फ्लेक्सी कॅप’च्या ‘रेगुलर प्लॅन’शी संबंधित आहे.

तुमची प्रतिक्रिया किवा प्रश्न विचारण्यासाठी खालिल फॉर्म भरा:

]]>
https://vasantkulkarni.com/debt-mutual-fund-2/feed/ 0
मज वेड लावले तु सांगू नको कुणाला… https://vasantkulkarni.com/parag-parekh-flexi-cap-fund/ https://vasantkulkarni.com/parag-parekh-flexi-cap-fund/#respond Sun, 31 May 2026 18:00:10 +0000 https://vasantkulkarni.com/?p=8499

मज वेड लावले तु सांगू नको कुणाला…

मागील रविवार दिनम २४ मे रोजी पराग पारीख फ्लेक्झीकॅपने १३ वर्षे पूर्ण करून १४ व्या वर्षात पदार्पण केले. समभाग गुंतवणूककरणाऱ्या सक्रीय व्यवस्थापित फंडात सर्वात मोठी मालमत्ता असलेला हा फंड आहे. या फंडाची पहिली शिफारस २५ मे २०१५ त्या नंतर २०१६, २०१८ २० मे २०२४ मागील वर्षी २८ एप्रिल २०२५ आणि रोजी या फंडाचा आढावा घेण्यात आला होता. असा एखादा फंड क्वचितच आढळतो जो सर्व प्रकारच्या गुंतवणूकदारांना उपयुक्त ठरतो. ‘पराग पारीख फ्लेक्सी कॅप’ फंड हा फंड असाच एक फंड आहे जो मागील १३ वर्षांच्या दीर्घ कालावधीत मोठी संपत्ती निर्माण केलेला एक अव्वल फंड आहे. पराग पारीख लॉंग टर्म व्हॅल्यु फंड ते पराग पारीख फ्लेक्झीकॅप या प्रवास अनुभवणे ही रंजक गोष्ट आहे. केवळ फ्लेक्झीकॅप फंड गटातच नव्हे तर सक्रीय व्यवस्थापित समभाग गुंतवणूक करणाऱ्या फंडात सर्वाधिक मालमत्ता असणारा हा फंड आहे. सातत्यपूर्ण कामगिरी करणारा आणि केवळ स्वतःच्या ‘बेंचमार्क’लाच नव्हे, तर या फंड गटात तेरा वर्ष पूर्ण केलेले १७ फंड असून परताव्याच्या क्रमवारीत हा फंड दुसऱ्या स्थानी आहे. फंड गटातील बहुतेक फंडांना मागे टाकणारा हा फंड आहे. गुंतवणूकदाराच्या पोर्टफोलिओचा ‘मुख्य भाग’ (कोअर) म्हणून समाविष्ट करण्यासाठी हा फंड अत्यंत योग्य फंड आहे. हा फंड ‘व्हॅल्यु फंड’ म्हणून अस्तित्वात आल्याने साहजिकच या फंडाची रणनीती ‘मूल्याधारित गुंतवणुकीवर’ अहे; हा फंड भारताबाहेर सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांत गुंतवणूक करून आपल्या पोर्टफोलिओत वैविध्य साधत असतो. सध्या या फंडाच्या गुंतवणुकीत मायक्रोसॉफ्ट, मेटा प्लॅटफॉर्म (फेसबुक), अल्फाबेट (गुगल) अॅमेझॉन या चार कंपन्यांचा समावेश आहे. या फंडाचे दुसरे वैशिष्ठ्य म्हणजे निधी व्यवस्थापक समभाग गुंतवणूक आणि रोख रक्कम कर्जसाधनांमध्ये योग्य प्रमाणात गुंतवणूक करून जोखीम नियंत्रित करतात. या फंडाच्या गुंतवणुकीत जानेवारी फेब्रुवारी २६ मध्ये ३५ टाक्यांच्या आसपास रोख रक्कम होती. मार्च मधील घसरणी दरम्यान ही रोख रक्कम गुंतविण्यात आली. सध्या भूराजकीय परिस्थितीमुळे निर्देशांक उच्चांका पासून १२ -१५ टक्के घसरले असतांना विविध उद्योग क्षेत्रांतील कंपन्यांच्या समभागांच्या किमती २०-४० टक्क्यांनी घसरल्या आहेत. त्यामुळे गुंतवणुकीची आकर्षक संधी निर्माण झाली आहे. ‘मूल्याधारित गुंतवणूक’ सद्य स्थितीत एक अत्यंत फायदेशीर पर्याय ठरतो. युद्ध समाप्तीच्या औपचारिक घोषणेनंतर बाजारपेठेत पुन्हा तेजी आल्यास, त्या तेजीचा लाभ घेण्यासाठी या फंडगटात ‘पराग पारीख फ्लेक्सी कॅप’ हा फंड सर्वात सुस्थितीत आहे. अनेक आरंभ शूर गुंतवणूकदार मला दहा वीस वर्षे एसआयपी करायची आहे फंड सुचवा असे सांगतात. प्रत्यक्षात एक दोन वर्षात बाजार घसरणी दरम्यान एसआयपी बंद करतात. खरोखर दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्याच्या दृष्टीने, या फंडामध्ये ‘एसआयपी’ द्वारे गुंतवणूक सुरू करणे हिताचे ठरेल.

प्रेमात पडावे अशी उत्कृष्ट कामगिरी
फंड परतावा क्रमवारीत हा फंड एक वर्ष (२२/३९) तीन वर्षे (१२/३४) पाच वर्षे (४/२४) दहा वर्षे (२/१९) स्थानी आहे . मागील १३ वर्षात वर्षांच्या फंडाने वार्षिक १७.६१ टक्के दराने परतावा दिला आहे. मॉर्निंगस्टारने २०२५ चा सर्वोत्कृष्ठ इक्विटी फंड हा पुरस्कार देऊन गौरविले आहे. या फंडाला हा पुरस्कार ओळीने दुसऱ्या वर्षी मिळविला आहे. मे २०१३ ते मे २६ या कालावधीतील पाच वर्षांच्या ‘रोलिंग रिटर्न्स’चा (rolling returns) विचार करता, ‘पराग पारिख फ्लेक्सी कॅप’ने सरासरी १८.४८ टक्के परतावा दिला आहे. तसेच, वर नमूद केलेल्या कालावधीत, ५ वर्षांच्या रोलिंग रिटर्ननुसार हा फंड ‘निफ्टी ५०० टीआरआय’ला प्रत्येक वेळी (१०० टक्के वेळा) मागे टाकण्यात यशस्वी झाला आहे. ले आहे. मे २०१३ ते मे २६ या काळात, या फंडाने ४० टक्के वेळा १५ ते २० टक्के तर ३८ टक्के वेळा २० टक्क्यांहून टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. गेल्या १० वर्षांतील (१ जून २०१६ ते २९ मे २०१६) या फंडाचा एसआयपी परतावा १६.९८ टक्के इतका उत्कृष्ट राहिला आहे. याच कालावधीत, ‘निफ्टी ५०० टीआरआय’ने १५.७ टक्के परतावा दिला आहे.

भारतातीच्या समभाग गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंड परिघातील सर्वात मोठा इक्विटी फंड असूनही, ‘पराग पारिख फ्लेक्सी कॅप’ फंडाचा पोर्टफोलिओत पसारा नाही. विविध बाजार आवर्तनात त्याच्या गुंतवणुकीमध्ये मार्च २६ मध्ये ४३ कंपन्या होत्या. एकंदरीत, हा फंड देशांतर्गत आणि परदेशी गुंतवणुकीचा उत्कृष्ट मेळ साधतो आणि त्यासोबतच जोखीम-व्यवस्थापित करण्याचा दृष्टिकोन दिसून येतो. ७ ते १० वर्षांच्या कालावधीसाठी सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन द्वारे या फंडामध्ये सातत्याने गुंतवणूक केल्यास, गुंतवणुकीतून उत्तम परतावा मिळण्याची शक्यता असते.

$परताव्याची ही सर्व आकडेवारी ‘पराग पारिख फ्लेक्सी कॅप’च्या ‘रेगुलर प्लॅन’शी संबंधित आहे.

तुमची प्रतिक्रिया किवा प्रश्न विचारण्यासाठी खालिल फॉर्म भरा:

]]>
https://vasantkulkarni.com/parag-parekh-flexi-cap-fund/feed/ 0